Corona: कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं; मोदी सरकारच्या हालचालींना वेग

मुंबई | जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाचा (Corona) संसर्ग पुन्हा वेगाने पसरत आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने राज्यांना इन्फ्लूएंझा आणि श्वसन संसर्गावर लक्ष ठेवण्यास सांगितलं आहे.

कोरोनाचा वाढता धोका पाहता आरोग्य विभागाने सर्व राज्यांना पत्र लिहित धोक्याची सुचना आणि सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. येत्या काळात कोरोनाचा धोका आणखी वाढू नये, यासाठी केंद्राने आतापासून काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

भारतात कोरोनाची प्रकरणे कमी होताना दिसत होती. वाढीव देखरेखीचा एक भाग म्हणून ILI आणि SARI ग्रस्त रूग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांसाठी कोविड चाचणी केली जाईल आणि संक्रमित नमुने जीनोम अनुक्रमासाठी पाठवावे, अशा सुचना देण्यात आल्या आहेत.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहेत. आर्थिक आणि सामाजिक उपक्रम पुन्हा सुरू करताना सावधगिरी बाळगणे आणि दक्षता घ्यावी यावर पत्रात भर दिला आहे.

राज्य यंत्रणेने आवश्यक जागरूकता निर्माण केली पाहिजे आणि कोविड योग्य वर्तनाचे पालन केलं पाहिजे, अशा सुचना देखील देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, 6 मार्च रोजी आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक झाली होती. त्यावेळी देखील कोरोनासंदर्भात सुचना करण्यात आल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या – 

“The Kashmir Files चित्रपट न पाहणाऱ्यांना 2 वर्ष जेलमध्ये टाका”

 बंपर ऑफर! होळीनिमित्त Hondaच्या गाड्यांवर मिळणार तब्बल 25 हजारांचा डिस्काऊंट

 ‘संपूर्ण जगात याची चर्चा होणार’; करूणा शर्मा यांची मोठी घोषणा

जिओकडून नव्या प्लॅनची घोषणा, अनलिमिटेड कॉलिंगसह नेटही मिळणार! 

कोरोनाचा विस्फोट होऊ लागल्यानंतर मोदी सरकारचा राज्यांना अलर्ट, म्हणाले…