मुंबई | मुंबईतील नौदल डॉकयार्ड येथे मंगळवारी एक अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
या अपघातात नौदलाच्या तीन जवानांना आपला जीव गमवावा लागला आहे. हा अपघात ‘INS Ranvir’वर झाला ज्याच्या अंतर्गत डब्याचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्फोट होताच जहाजातील कर्मचाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू केला होता.
स्फोटानंतर आग आटोक्यात आणण्यात आली असली तरी जहाजाचे फारसे नुकसान झाले नाही. तर तीन जवान शहिद झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यावर नौदलाने अद्याप कोणतीही माहिती दिली नाही.
या घटनेनंतर लगेचच बचावकार्य सुरू करण्यात आले. जहाजातील कर्मचाऱ्यांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.
या अपघातात जहाजाचं फारसं नुकसान झालं नाही. पूर्व नौदल कमांडमधील आयएनएस रणवीर नोव्हेंबर 2021 पासून किनारपट्टी भागात कार्यरत होती.
दरम्यान, या प्रकरणावर आता चौकशी समितीकडे आदेश पाठवण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
“नाना पटोलेंची जीभ… 1 लाख रूपये बक्षिस देणार”; भाजप नेत्याची खुली धमकी
“…कुछ नन्हें पटोले”; अमृता फडणवीसांची पटोलेंवर शायराना अंदाजात टीका
“नानांनी तर हद्दच केली, मालकिणीचा सगळ्यात प्रामाणिक कुत्रा दाखवण्यासाठी…”
“नाना पटोलेंनी राजीनामा द्यावा अन् येरवड्यात दाखल व्हावं”
“शरद पवार साहेबांनी मेट्रोतून चक्कर मारून आणा असा हट्ट केला का?”