मुंबई | सध्या सर्व टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्जचे रेट वाढवले आहेत. जुन्या प्लॅनमध्ये बदल करून नवीन रेटमध्ये ग्राहकांना रिचार्ज घ्यावा लागत आहे. अशा परिस्थितीतही रिलायन्स जिओने (Reliance Jio) आपल्या प्लॅनसमध्ये वाढ केली होती.
जिओने आपले प्लॅनमध्ये वाढ केल्यानंतर प्रतिस्पर्धी कंपन्यांनी देखील रिचार्जचे रेट वाढवले होते. मात्र, जिओने आता ग्राहकांना आकर्षित प्लॅन तयार केला आहे. यापैकी काही प्लॅन अतिशय खास आहेत.
रिलायन्स जिओने 1 डिसेंबरपासून रिचार्ज प्लॅन्स 480 रुपयांपर्यंत महाग केले आहेत. रिलायन्स जिओच्या नवनवीन प्लॅनमध्ये 99 रुपयांपासून ते 3,499 रुपयांपर्यंतचे रिचार्ज प्लॅन आहेत.
तुम्ही रिलायन्स जिओ 599 रुपयांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला 84 दिवसांची वैधता मिळेल. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2GB डेटा मिळेल.
एकूण, 100 GB हाय-स्पीड डेटा देखील उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये रिचार्ज केल्यानंतर तुमचा डेटा संपला तर तुम्ही फक्त 10 रूपये प्रति जीबी दराने इंटरनेट चालवू शकता.
जर तुम्ही जिओचा 599 रूपयांचा प्लॅन घेतला तर Netflix व्यतिरिक्त तुम्हाला Amazon Prime Video आणि Disney Hotstar चं 1 वर्षासाठी सबस्क्रिप्शन देखील मिळणार आहे.
Jio चा 599 चा प्लॅनसह तुम्हाला 99 रूपयांचा जिओ प्राईमची सबस्क्रिप्शन घेणं गरजेचं आहे. त्यानंतर जिओच्या या प्लॅनची मजा घेता येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! भारतीय नौदलाच्या INS Ranvirवर स्फोट, नौदलाचे 3 जवान शहीद
“नाना पटोलेंची जीभ… 1 लाख रूपये बक्षिस देणार”; भाजप नेत्याची खुली धमकी
“…कुछ नन्हें पटोले”; अमृता फडणवीसांची पटोलेंवर शायराना अंदाजात टीका
“नानांनी तर हद्दच केली, मालकिणीचा सगळ्यात प्रामाणिक कुत्रा दाखवण्यासाठी…”
“नाना पटोलेंनी राजीनामा द्यावा अन् येरवड्यात दाखल व्हावं”