25 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या ‘या’ स्टॉक्सनी गुंतवणूकदारांना केलं मालामाल!

मुंबई | तुम्हाला देखील शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे असतील तर तुम्ही पेनी स्टॉक मध्ये गुंतवणूक करू शकता. 25 रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या स्टॉकला पेनी स्टॉक म्हणतात. हे स्टॉक खूप स्वस्त असतात आणि त्यांचे बाजार मूल्य कमी आहे.

या शेअर्सची किंमत साधारणपणे ₹25 च्या खाली असते, ज्यामुळे ते गुंतवणूकदारांसाठी खूप आकर्षक ठरतात. मात्र या शेअर्समध्ये जोखीम तितकीच जास्त आहे.

गोपाला पॉलीप्लास्ट लिमिटेडच्या शेअरमध्ये गेल्या 1 वर्षात 14850 टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि या काळात या शेअरची किंमत 1 रुपयांवरून 167.45 रुपयांपर्यंत वाढली आहे. मात्र हा स्टॉक NSE वर सूचीबद्ध नाही आणि त्याचे मार्केट कॅप 120 कोटी रुपये आहे.

ही एक IATA द्वारे संचालित एअरफ्रेट सेवा प्रदाता कंपनी आहे. कंपनी सागरी वाहतुकीसह हवाई, रेल्वे आणि इतर मार्गांनी मालाच्या वाहतुकीसाठी लॉजिस्टिक सुविधा पुरवते. कंपनी जवळजवळ 30 वर्षांपासून व्यवसायात आहे आणि 84 पेक्षा जास्त देशांमध्ये सेवा पुरवते.

Xpro इंडिया हा स्टॉक 1 वर्षात 5.72 रुपयांवरून 629.4 रुपयांपर्यंत वाढला आहे. या कालावधीत या स्टॉकने 10,903 टक्के परतावा दिला आहे. गोपाला पॉलीप्लास्ट लिमिटेड एचडीपीई/पीपीपासून विणलेल्या पोत्या किंवा पिशव्या तयार करते. त्याची स्थापित क्षमता 7925 टन आहे.

कंपनी इतर कापड उत्पादनांसाठी लेबल्स बनवते. जे रेडिमेड कपडे, होजरी, टेरी टॉवेल, शूज आणि विणलेल्या कपड्यांमध्ये वापरले जातात.

गेल्या 1 वर्षात या शेअरमध्ये 3145.54 टक्के वाढ झाली आहे. त्याची लेटेस्ट क्लोजिंग किंमत 691.3 रुपये आहे. इलेक्ट्रिक वाहनांशी निगडीत प्रचंड क्षमता पाहता या स्टॉकमध्ये पुढे आणखी तेजी येण्याची शक्यता आहे.

ही बिर्ला ग्रुपची कंपनी आहे. त्याचे अनेक विभाग आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे युनिट्स आहेत. ही एक पॅकेजिंग व्यवसाय कंपनी आहे. ज्यांचे मार्केट कॅप 816 रुपये आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

‘तुमच्यापेक्षाही घाण शिव्या आम्हाला देता येतात’; राजू शेट्टींचा थेट इशारा

‘त्यावेळी माझी बायको नातवंडांसह दिवसभर…’; छगन भुजबळांनी दिला आठवणींना उजाळा

गोपीचंद पडळकरांची गाडी फोडली; भाजप-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा

भारताचं आव्हान संपुष्टात! टीम इंडिया वर्ल्ड कपमधून बाहेर

“परमबीर सिंह यांना भाजपने गायब केलं, त्यांचं शेवटचं लोकेशन…”