“हेडमास्तर कुठं गेेले? तो दरारा कुठंय?”, ‘त्या’ कारवाईनंतर चित्रा वाघ संतापल्या

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्यावर करण्यात आलेल्या आक्षेपार्ह ट्विट्मुळे सध्या संपूर्ण राज्याचं राजकारण तापलं होतं.

भाजपचे महाराष्ट्र आयटी सेल प्रभारी जितेन गजारिया यांना वादग्रस्त ट्विट् केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आता भाजप देखील आक्रमक झाल्याचं पहायला मिळतंय.

जितेन गजारिया यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी थेट गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहिलं आहे.

या पत्रात चित्रा वाघ यांनी शिवसेनेेचे खासदार संजय राऊत आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर देखील कारवाईची मागणी केली आहे.

अनेकदा आपल्याला आठवण करून दिली तरी संजय राऊत आणि गुलाबराव पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही, असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

विधानसभा अध्यक्षपदी असताना आपण हेडमास्तर सारखी भूमिका बजावली पण गृहमंत्री झाल्यावर तो दरारा कुठं गेला? हेडमास्तर कुठं हरवले आहेत?, असा सवाल देखील चित्रा वाघ यांनी विचारला आहे.

जितेन गजारिया यांच्या वक्तव्याचं आम्ही समर्थन करत नाहीच. त्यांच्यावर कारवाई होयलाच पाहिजे, याबद्दल काही दुमत नसल्याचं देखील चित्रा वाघ यांनी सांगितलं आहे.

भर लाईव्ह कार्यक्रमात खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या नेत्यांना जाहीरपणे शिव्या दिल्या. त्यावर गृहमंत्रालय मूग गिळून गप्प का बसलंय?, असा परखड सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, या मुद्द्यावरून चित्रा वाघ आक्रमक झाल्याने आता राजकारण तापण्याची शक्यता आहे. अशातच या पत्रावर आता गृहमंत्रालय काय उत्तर देतं याकडे  सर्वांचंच लक्ष लागलंय.

महत्वाच्या बातम्या –

‘या’ 5 पेनी स्टॉक्सने दिले जबरदस्त रिटर्न्स; फक्त 5 दिवसात गुंतवणूकदार मालामाल

Corona Alert! गेल्या 24 तासात राज्यातील रुग्णसंख्येत मोठी वाढ; वाचा आकडेवारी

“नाना पटोले यांच्यावर कारवाई करा, त्यांना…”, चंद्रकांत पाटलांची आक्रमक मागणी

नाचत नाचत आला अन् आमदाराला कानाखाली मारून गेला; व्हिडीओ तुफान व्हायरल

सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी! सोन्याच्या दरात गेल्या 6 वर्षातील सर्वात मोठी वार्षिक घट