सेक्स पॉवर वाढवण्याच्या गोळ्या घेणं अंगलट, तरुणासोबत घडला विचित्र प्रकार

बंगळुरु | कमी वेळात जास्त पैसे मिळवणे हे आजकाल अनेक लोकांचं स्वप्न असतं, त्यामुळे काही लोक काहीही करायला तयार असतात तर काही लोक या कारणामुळे सायबर क्राईमचे शिकार बनले आहेत. आपल्या देशात सायबर क्राईमची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली असून याबाबतचे अनेक गुन्हे पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आहेत. ( 5 Sex power improvement pills racket news )

असाच एक प्रकार बंगळुरुत घडला आहे. प्रत्येकानं ही बातमी नक्कीच वाचायला हवी. नुसती वाचायलाच पाहिजे असं नाही तर त्यापासून धडा देखील घेतला पाहिजे. बंगळुरुमधील एक टॅक्सी चालकही सायबर गुन्ह्याचा शिकार ठरला आहे. हा प्रकार अत्यंत धक्कादायक असून प्रत्येकाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारासुद्धा आहे.

बंगळुरु येथील बेल्लांदुर भागात राहणाऱ्या एका टॅक्सी ड्रायव्हरने कामसेतू सेक्स गोल्ड औषधांच्या गोळ्या विकत घेतल्या होत्या. या गोळ्या कामभावना भडकवण्यासाठी घेतल्या जातात. संबंधित टॅक्सी ड्रायव्हरचं नाव अमन असं असून त्याने खरेदी केलेल्या गोळ्यांवर एक मोठ्या रकमेचं बक्षिस देणारं गिफ्ट कार्ड तुम्हाला लागलेलं आहे, असं सांगणारा फोन त्याला आला होता. त्यानंतर सायबर चोरांनी त्याला 2 लाख 17 हजार रुपयांना गंडा घातला आहे. ही अत्यंत धक्कादायक घटना आहे.

अमनला गिफ्टकार्ड बद्दल सांगण्यात आल्यानंतर त्याने देखील त्यावर लगेच विश्वास ठेवला. ते गिफ्ट कार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला काही रक्कम भरावी लागेल, असं सांगून त्या चोरांनी त्याच्याकडून 2.17 लाख रुपये लंपास केले. ही गोष्ट अमनच्या फसवणूक झाल्यानंतर लक्षात आली. अमनने व्हाइटफिल्ड सीईएन पोलीस ठाण्यात आयटी कायद्यांतर्गत तक्रार नोंदवली आहे.

दरम्यान, चोरांना पकडण्यात पोलिसांना अजून यश आलेलं नाही. तसेच ऑनलाइन व्यवहार करताना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना सायबर क्राइम विभागातील पोलीसांनी दिल्या आहेत, तसेच ते त्या वारंवार देत असतात. गिफ्टच्या मोहापोटी अमनला दोन लाखांहून अधिक रुपयांचा फटका बसला आहे, त्यामुळे तुम्ही अशाप्रकारे अनोळखी व्यक्तीसोबत व्यवहार करताना काळजी घ्यायला हवी.

महत्त्वाच्या बातम्या-

‘सुशांतसारखं कार्तिकलाही फासावर जाण्यास भाग पाडू…

‘तो’ फोटो शेअर करत कंगना रणौतनं महाराष्ट्रातील…

फक्त 10 मिनिटं भेटशील का?’ चाहत्याच्या प्रश्नावर…

सिनेसृष्टीला मोठा धक्का: प्रेक्षकांना पोट धरुन हसवणाऱ्या…

फँड्रीतील शालूचा ‘हा’ व्हिडीओ सोशल मीडियावर…