धक्कादायक! 59 डॉक्टरांना कोरोनाची लागण, ‘हे’ रूग्णालय ठरत आहेत हॉटस्पॉट

नवी दिल्ली | देशात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. देशात सर्वाधित कोरोनाबाधित रूग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत.

देशात महाराष्ट्रापाठोपाठ सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण राजधानी दिल्लीत आहेत त्यामुळे सगळीकडेच भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.

दिल्लीत कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ दिसून येत आहे. राजधानीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना तब्बल 59 डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे.

दिल्लीतील काही महत्वाचे रूग्णालय कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहेत. सफदरजंग रूग्णालय, लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज, एम्स ट्रॉमा सेंटर, आरएमएल आणि मौलाना आझाद मेडिकल कॉलेज कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहे.

सफदरगंज रूग्णालयातील 23 डॉक्टर्सना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर हार्डिंग मेडिकल कॉलेजमधील 15, एम्स ट्रॉमा सेंटरमधील 5, आयएमएलमधील 11 आणि मौलाना आझाद मेडिकल कॉलेजच्या 4 निवासी डॉक्टर्सना कोरोनाची लागण झाली आहे.

या पाच रूग्णालयांसह दिल्लीतील जवळपास 59 डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. या रूग्णालयांतील 80 पेक्षा अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांचे कोरोना अहवाल येणं अद्याप बाकी आहे.

वेगवेगळ्या रूग्णालयातील अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या आठवड्याभरात आरोग्य कर्मचारी व डॉक्टरांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना संक्रमणाचा धोका वाढला आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनापासून संरक्षण देण्यासाठी येत्या 10 जानेवारीपासून आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस देण्यात येणार आहे.

दरम्यान, राजधानी दिल्लीत सरकारी व खासगी आरोग्य सेवांमध्ये कार्यरत असलेले अडीच लाखांहूनही अधिक आरोग्य कर्मचारी आहेत. मात्र, बूस्टर डोस देण्यापूर्वीच अनेकांना कोरोनाची लागण होत असल्याचं समोर आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

ओमिक्रॉनला रोखण्यासाठी ‘हाच’ सर्वोत्तम उपाय, संशोधनातून महत्वाची माहिती समोर

पोस्ट ऑफिसची सर्वोत्तम योजना; गुंतवणूक केल्यास करात मिळेल सवलत

‘…तर इमारत सील केली जाईल’; महापालिकेने जारी केली नवी नियमावली

महाविकास आघाडीत नाराजीचा सुर; शिवसेना नेत्याचे राष्ट्रवादीवर गंभीर आरोप

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; भरघोस पगारवाढ होण्याची शक्यता