व्हिडीओ कॉल उचलताच तिने उतरवले कपडे त्यानंतर घडला अत्यंत धक्कादायक प्रकार!

पाटणा | बिहारच्या पाटणामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. विमा एजंट म्हणून काम करणाऱ्या तरुणाला अगोदर एक फोन आला. आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला विमा काढायचा असून त्याचे डिटेल्स पाठवण्यासाठी व्हॉट्सअप नंबर देण्याची विनंती तरुणीनं केली.

तरुणाने नंबर दिल्यानंतर तरुणीने त्याला व्हॉट्सअपवर व्हिडीओ कॉल केला आणि त्याच्याकडे पाहून हसू लागली. तरुणाला काही समजण्याच्या आतच तिने स्वतःचे एकेक कपडे काढायला सुरुवात केली आणि काही मिनिटांत ती पूर्ण नग्न झाली. त्यानंतर फोन कट झाला.

काही वेळातच तरुणाच्या मोबाईलवर काही फोटो आले. त्यात नग्न तरुणी आणि तिच्याकडे पाहणारा तरुण असा फोटो होता. ते पाहून तरुणाला जबर धक्का बसला.

तरुणीने त्याला फोन केला आणि हा व्हिडीओ व्हायरल होऊ नये, असं वाटत असेल, तर 50 हजार रुपये देण्याची मागणी केली. मात्र तरूणाने ही मागणी फेटाळून लावत तिला पैसे देण्यास नकार दिला. त्यावर तरुणीने हा व्हिडीओ सायबर सेलकडे पाठवण्याची धमकी दिली आहे.

तुझ्याविरोधात तक्रार दाखल झाली असून लवकरच तुला अटक होऊ शकते, असं कॉलवरून सांगण्यात आलं. अटक टाळायची असेल, तर तरुणीसोबत सेटलमेंट करण्याचा सल्लाही त्याला देण्यात आला.

तरुणाने तरूणीच्या कोणत्याही त्यालाही भीक घातली नाही. त्यानंतर दिवसाला 50 कॉल येऊ लागले. मात्र तरुण पैसे न देण्याच्या भूमिकेवर ठाम राहिला आणि या प्रकरणात पोलिसांची मदत घेतली.

दरम्यान, तरुणाने सायबर सेलमध्ये धाव घेत या प्रकाराची माहिती दिली आणि तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हेगारांचा तपास सुरू केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

धक्कादायक! 59 डॉक्टरांना कोरोनाची लागण, ‘हे’ रूग्णालय ठरत आहेत हॉटस्पॉट

ओमिक्रॉनला रोखण्यासाठी ‘हाच’ सर्वोत्तम उपाय, संशोधनातून महत्वाची माहिती समोर

पोस्ट ऑफिसची सर्वोत्तम योजना; गुंतवणूक केल्यास करात मिळेल सवलत

‘…तर इमारत सील केली जाईल’; महापालिकेने जारी केली नवी नियमावली

महाविकास आघाडीत नाराजीचा सुर; शिवसेना नेत्याचे राष्ट्रवादीवर गंभीर आरोप