भारतीय जवानांना मोठं यश; जम्मू-कश्मीरमध्ये 6 दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर | जम्मू-कश्मीरमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत 6 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आलं आहे. या चकमकीत एक भारतीय जवान शहीद झाला आहे.

जम्मू आणि कश्मीरमधील अनंतनाग आणि कुलगाम या जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या चकमकी झाल्या. या चकमकीत भारतीय जवानांनी मोठं यश मिळवत 6 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

अनंतनागमध्ये झालेल्या चकमकीत जम्मू-कश्मीर पोलीस दलातील तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. या तिन्ही जखमी पोलीसांची तब्येत आता स्थिर असल्याची माहिती कश्मीरचे पोलीस निरीक्षक विजय कुमार यांनी दिली आहे.

कुलगाम येथे झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदचे तीन दहशतवादी ठार झाले आहेत. यात एक पाकिस्तानी दहशतवादी तर दोन स्थानिक दहशतवाद्यांचा समावेश होता.

अनंतनागमध्ये रात्री झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला होता. यावेळी तीन लष्करी जवान आणि एक स्थानिक पोलीस जखमी झाले होते.

उर्वरीत जखमी जवानांची प्रकृती सध्या स्थिर आहे. मात्र, गंभीर जखमी अवस्थेत असलेला एक भारतीय जवान शहीद झाला आहे.

या चकमकीत ठार झालेले दहशतवादी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते. ठार झालेल्या सहा दहशतवाद्यांमध्ये दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा तर चार स्थानिक दहशतवाद्यांचा समावेश होता.

या चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून दोन एम-4 आणि चार एके-47 रायफल्स जप्त करण्यात आल्या आहेत. आयजीपी विजय कुमार यांनी ही भारतीय सैन्याची मोठी कारवाई असल्याचं मत व्यक्त केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

लसवंत होणारी सर्वात पहिली अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाची लागण

“देवेंद्रजी तुम्ही उद्या मुख्यमंत्री व्हाल आणि भविष्यात पंतप्रधानही व्हाल पण…”

वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कालीचरणला अखेर अटक!

संप करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना आणखी एक धक्का; कर्मचाऱ्यांच्या पगारातून…