मुंबई | राज्यातील कोरोनाची वाढती आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. राज्यात मुंबईत सर्वात जास्त कोरोनाबाधित रूग्ण आढळून आल्याने भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.
गेल्या काही दिवसांत मुंबईत कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत झपाट्याने वाढ होत आहे. मुंबईतील कोरोना रूग्णांच्या संख्येवरून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी चिंता व्यक्त केली आहे.
मुंबईत ओमिक्रॉन वाढत आहे. लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळलं पाहिजे. मी स्वत:हा लग्न समारंभ,सभा यांना जाणार नाही, असं किशोरी पेडणेकर पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाल्या आहेत.
मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता आहे. गर्दीत काही लोक मास्क लावत नाहीत. मुंबईत कोरोनाची तिसरी लाट आली तर त्यासाठी मास्क न लावणारे लोक धोका ठरू शकतात, अशी भीती किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केली आहे.
मुंबईत कोरोनाची तिसरी लाट भयानक असू शकते, अशी शक्यता देखील किशोरी पेडणेकर यांनी बोलून दाखवली आहे. तर लोकांनी मास्कचा व्यस्थित वापर करावा असं आवाहनही किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे.
ओमिक्रॉनसाठी मुंबई महापालिका सज्ज असल्याचं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं आहे. जम्बो कोविड सेंटर मॅन पॉवरसह सज्ज ठेवणार आहोत, असं आश्वासन देखील किशोरी पेडणेकर यांनी दिलं आहे.
राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पंतप्रधानही लॉकडाऊन करावं लागेल असं सांगत आहेत. त्यामुळे लोकांनी कोरोना नियमांचे पालन करावे, असं आवाहन किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे.
लोकांनी केवळ कारवाई केली जाते म्हणून नाही तर स्वत:च्या सुरक्षेसाठी मास्क वापरावा. मुंबईत बाहेरून येत असाल तरीही नियमांचं पालन करा, अशी विनंती देखील किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.
दरम्यान, मुंबईत संपूर्ण राज्याच्या तुलनेत सर्वात जास्त कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यामुळे मुंबई कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
भारतीय जवानांना मोठं यश; जम्मू-कश्मीरमध्ये 6 दहशतवाद्यांचा खात्मा
“आम्ही मोदींचं अनुकरण करतो, ते मास्क लावत नाहीत म्हणून आम्हीही लावत नाही”
लसवंत होणारी सर्वात पहिली अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाची लागण
“देवेंद्रजी तुम्ही उद्या मुख्यमंत्री व्हाल आणि भविष्यात पंतप्रधानही व्हाल पण…”
वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय!