IPL 2022 चं बिगुल वाजलं: कोणाचा सामना कोणाशी होणार?, वाचा एका क्लिकवर

मुंबई | अखेर क्रिकेटप्रेमींची प्रतिक्षा संपली. बहुचर्चित आणि अतिप्रतिक्षेत असलेली आयपीएल अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे.

आयपीएल 2022चं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं असून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचल्याचं पहायला मिळत आहे.

26 मार्चपासून आयपीएल 2022 ला सुरुवात होणार असून बीसीसीआयनं आज इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर केलं आहे.

यंदा 10 संघ 70 सामने खेळवण्यात येणार आहेत. यावर्षीचा फॉरमॅट थोडा वेगळा असणार आहे. आयपीएलचा पहिला सामना चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्समध्ये खेळवला जाणार आहे.

पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पहायला मिळेल, जो संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाणार आहे.

दोन टीम वाढल्याने आयपीएलच्या मॅचही वाढल्यात, त्यामुळे यंदा डबल हेडरची संख्याही जास्त आहे. म्हणजे एका दिवशी दोन सामने खेळवले जाणार.

यंदाच्या आयपीएल सामन्यांसाठी प्रेक्षकांना 25 टक्के उपस्थिती राज्य सरकारनं दिली आहे. यंदाचे काही सामने पुण्यात तर काही मुंबईत खेळवले जाणार आहेत.

वेळापत्रक जारी झाल्यापासून प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर उस्तुक असल्याचं दिसत आहे. त्यामुळे यंदा कोणता संघ विजेता ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या – 

  “ईडी पेक्षा शेतकऱ्यांच्या खिशातल्या गणेश बिडीची किंमत जास्त”

  “पंतप्रधान मोदीच देव असल्यासारखं भाजपचं वर्तन” 

  “82 वर्षाचा झालो म्हणजे म्हातारा नाही, जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत…”

  पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे, वाचा एका क्लिकवर 

  …तोपर्यंत एसटीमध्ये नोकर भरती बंद, एसटी महामंडळाचा मोठा निर्णय!