मुंबई | सध्या ग्राहकांच्या ऑनलाईन बॅंकिंग व्यवहारामध्ये वाढ झाली आहे. सातत्यानं बॅंक ग्राहकांना विविध आकर्षक योजना देत आहे. परिणामी ग्राहकांना सतर्कता देखील बाळगावी लागत आहे.
क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुम्ही किमान त्या चार गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, ज्या आम्ही पुढे सांगणार आहोत. या गोष्टी तुमच्या क्रेडिट कार्डचा अधिक चांगला वापर करण्याशी संबंधित आहेत.
काळजी घेतली नाही तर या चुकीचा तुमच्या सीबील स्कोअरवर वाईट परिणाम होईल. ऑप्टिमा मनी मॅनेजर प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ पंकज मठपाल यांनी क्रेडिट कार्डशी संबंधित माहिती दिली आहे.
खूप जास्त क्रेडिट कार्ड असणे टाळा. वास्तविक, आजकाल अनेक को-ब्रँडेड कार्ड आहेत. ट्रॅव्हल कार्ड्सपासून ते पेट्रोल कार्ड आणि शॉपिंग कार्ड्सपर्यंत अशी अनेक भिन्न कार्डे आहेत. ज्यात रिवॉर्ड पॉइंट असतात ज्यांना लोक गृहीत धरतात.
अनेक कार्डमुळं नंतर त्यांचे व्यवस्थापन करणं कठीण होतं. त्यामुळे जास्त कार्ड बाळगणे टाळावे. कमी प्रमाणात कार्ड असल्यानं होणारे अनेक धोके देखील टाळता येतात. अशातच विविध कारणांनी क्रेडिट कार्डचं व्यवस्थापन महत्त्वाचं आहे.
क्रेडिट कार्डवरील पैशांचं वेळोवेळी व्यवस्थापन करणं देखील गरजेचं आहे. हफ्ते आणि लिमीट देखील व्यवस्थित ठेवणं हे महत्त्वाचं आहे. सर्व रक्कम वापरणे टाळा कारण सर्व रक्कम वापराल तर ग्राहकांचा क्रेडिट स्कोर खराब होतो.
क्रेडिट कार्डद्वारे एटीएममधून पैसे कधीही काढू नका. क्रेडिट कार्डद्वारे काढलेल्या पैशांवर व्याज लागू असल्यानं एटीएममधून पैसे काढताच व्याजदराने ग्राहकांना रक्कम भरावी लागते.
महत्त्वाच्या बातम्या –
ऐन लग्नसराईत सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले; वाचा आजचे ताजे दर
नवाब मलिकांना दिलासा नाहीच! कोर्टानं ‘या’ तारखेपर्यंत सुनावली न्यायालयीन कोठडी
आत्ताची सर्वात मोठी बातमी! ओबीसी आरक्षणाचं विधेयक अधिवेशनात मंजूर
“…तर अजित दादांना फासावर लटकवाल का?”
‘…तर मी विधानसभेतच फाशी घेईल’; रवी राणा भडकले