महाराष्ट्राला आणखी रूपयाचीही मदत दिली नाही; संभाजीराजे मोदी सरकारवर बरसले

मुंबई | महापूर आणि परतीच्या पावसाने महाराष्ट्रात अतोनात नुकसान केलेलं आहे. खरीप हंगामातील शेतकऱ्यांची उभी पिकं वाया गेली आहेत. पण केंद्र सरकारने अजूनही मदत दिली नाही. वेळेत पंचनामे न केल्याने केंद्र सरकारने मदत दिली नाही, असं खासदार संभाजीराजे भोसले यांनी राज्यसभेत सांगितलं आहे.

कोल्हापूर सांगलीचा महापूर असो किंवा अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान शासनाने आणखी एक रूपयाचीही मदत केलेली नाही, अशी जोरदार टीका संभाजीराजे भोसले यांनी मोदी सरकारवर केली आहे.

54 लाख हेक्टर सुपिक जमिनीचं नुकसान झालंय. एकतर यंदाच्या वर्षी मान्सून एक वर्ष उशीराने आला. आला तो अतिरिक्त पाउस घेऊन आला. यामध्ये उभी पिकं पाण्याखाली गेली तर सांगली कोल्हापुरातली घरं दारं देखील पाण्याखाली डुबली, असं संभआजीराजेंनी राज्यसभेत बोलताना सांगितलं.

दरम्यान, या सगळ्या नुकसान भरपाईकरिता 6813 कोटी आणि परतीच्या पावसाने नुकसान भरपाईकरिता 7207 कोटी रूपये मागितले होते. खेदाची गोष्ट म्हणजे यातील एकही रूपया महाराष्ट्राला मिळाला नाही, असं ते म्हणाले.

 

महत्त्वाच्या बातम्या-