“मुख्यमंत्रीसाहेब, बारामतीकरांची तमा न बाळगता पंढरपूर-फलटण रेल्वे मार्गाला निधी द्या”

सोलापूर |  बारामतीकरांचा कुठलाही दबाव न बाळगता केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मंजूर केलेल्या पंढरपूर-फलटण या नवीन रेल्वे मार्गाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निम्मा निधी द्यावा, अशी मागणी खासदार रणजित निंबाळकर यांनी केली आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातील रेल्वे प्रश्नावर बोलण्यासाठी रविवारी पंढरपूर येथे रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक बोलावण्यात आली होती. रेल्वे प्रश्नावरील जवळपास 500 विविध मागण्या यावेळी लोकप्रतिनिधींनी केल्या आहेत.

प्रस्तावित मार्गाला 1200 कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. त्यातील 50 टक्के निधी हा केंद्र सरकारकडून येतो. उर्वरीत 50 टक्के निधी राज्य सरकारने द्यावा, अशी मागणी निंबाळकर यांनी केली आहे. तसेच उद्धव ठाकरे पंढरपूरकरांना नाराज करणार नाहीत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

नागरिकांना रेल्वेचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाकडून सोयी-सुविधा मिळण्याबाबतच्या सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचं निंबाळकर यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या- 

-महिला दिनी राज ठाकरेंच्या खास शैलीत शुभेच्छा

-राज ठाकरे वर्धापनदिनी घेणार ‘हा’ मोठा निर्णय!

-कामगारांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार कामगार मंत्र्यांना, मला नाही- अमोल कोल्हे

-“राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करा, पण लोकहिताच्या कामाला स्थगिती देऊ नका”

-जसं आपणं पंढरपूर- शिर्डीला जातो, तसं उद्धव ठाकरे अयोध्येला जातात- सुप्रिया सुळे