कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील पेट्रोलपंप आजपासून राहणार अर्धावेळ बंद

पुणे | पुण्यातील सर्व पेट्रोल पंप दुपारनंतर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल डीलर्स असोसिएशनने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बंदच्या आवाहनाला अर्धवेळ पाठिंबा दिला आहे.

शनिवारी 21 मार्चपासून पुणे शहरातील सर्व पेट्रोल पंप दुपारनंतर बंद ठेवण्यात येणार आहे. पेट्रोल डीलर्स असोसिएशनच्या या निर्णयानुसार पुण्यातील सर्व पेट्रोल पंप हे सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत सुरु राहतील. तर शहराबाहेरील पेट्रोलपंप हे सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 11 या वेळेत सुरु राहणार आहेत.

31 मार्चपर्यंत हे सर्व पंप हे दुपारनंतर बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक असल्यास पेट्रोल पंपावर यावं असं आवाहन संघटनेनं केलं आहे.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत राज्यात 52 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. यातील 41 जणांची प्रकृती उत्तम असून आठ जणांना सौम्य लक्षणे पाहायला मिळत आहेत.

महत्वाच्या बातम्या – 

-अमेरिका ते भारत… ‘होम क्वारंटाईन’चा शिक्का असलेल्या अमेय वाघचा चित्तथरारक अनुभव

-“ही लढाई देशाची लढाई आहे हे विरोधी पक्षाने कधी समजून घेतलंच नाही.”

-उद्धवा, ‘पक्षपाती’ तुझे सरकार!; कोरोनासंदर्भातील शासननिर्णय न मिळाल्यानं मनसेची मुख्यमंत्र्यांवर टीका

-“देवेंद्र फडणवीस असते तर महाराष्ट्रात आज गावोगावी तिरड्या उठल्या असत्या”

-मेडिकल यंत्रणा जवानांप्रमाणे लढतेय, त्यांच्यावर ताण आणू नका- मुख्यमंत्री