चाणाक्ष महिला सरपंच… मुंबईतून आलेल्या 6 जणांना घरातच कोंडलं, 6 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह!

लातूर | मुंबईहून विना परवानगी घेता आलेल्या संपूर्ण कुटुंबाला निलंगा तालुक्यातील कोराळी येथे गावच्या महिला सरपंच गायकवाड यांनी घरातच कोंडून ठेवले. काही दिवसांनी त्यांची वैद्यकीय चाचणी केली असता  ते 6 जण कोरोनाबाधित असल्याचं स्पष्ट झाल्याने एकच  खळबळ उडाली. मात्र महिला सरपंचांच्या हुशारीमुळे मोठा अनर्थ टळला. त्यांच्या संपर्कात कुणीही आलं नाही.

कोराळी येथील कुटुंबीय गेल्या अनेक वर्षापासून मुंबईत राहत होते. या कुटुंबाच्या नात्यातील एकाचा मुंबईत आठ दिवसांपूर्वी कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती गावातील सरपंच, ग्रामसेवकांना मिळाली होती. अशातच हे कुटुंब कोणताही परवाना न घेता शनिवारी गावी आले आणि घरी लपून बसले. महिला सरपंच गायकवाड यांना हा प्रकार कळताच त्यांनी या कुटुंबाच्या घराला बाहेरून कुलूप लावून ठेवले आणि सकाळी त्या कुटुंबाला रुग्णालयात पाठवले.

निलंगा येथील रुग्णालयातून कुटुंबातील सदस्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठवल्यानंतर काल सायंकाळी त्यांचा अहवाल आला. त्यावेळी 6 जणांना कोरोना संसर्ग झाल्याचं स्पष्ट झाले. ही माहिती मिळताच तहसीलदार गणेश जाधव, तालुका आरोग्य अधिकारी श्रीनिवास कदम, यांनी कोराळी गावास भेट देऊन परिसर सील केला.

दरम्यान, सरपंचांनी सतर्कता दाखवून योग्य वेळीच त्या कुटुंबाला घरात कोंडून ठेवल्यामुळे हे कुटुंब गावातील कुणाशी संपर्कात आले नाही, अशी भावना आता गावकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

महत्वाच्या बातम्या-

-राज्यासाठी नेमकं काय करतोय याचं जरा आत्मपरिक्षण करा; रोहित पवारांचा फडणवीसांना सल्ला

-लोकांमध्ये विश्वास निर्माण करा, मंत्री अधिकाऱ्यांना कामाला लावा; पवारांचा मुख्यमंत्र्यांना कानमंत्र

-‘खोटं बोलू नका’; काँग्रेसच्या त्या ट्विटवर अनुपम खेर संतापले

-लॉकडाउनचा नियम मोडला; ‘या’ भाजप आमदारावर दुसऱ्यांदा गुन्हा दाखल

-“बिरोबाच्या शपथेचं मी अन् बिरोबा बघून घेऊ; पवारांच्या बगलबच्च्यांनी मला सांगू नये”