कोरोनाबाबत अत्यंत मोठी घडामोड; अशा प्रकारे कोरोनाचा आता हवेतच खात्मा होणार!

ओटावा | गेल्या काही महिन्यांपासून कोरोनानं  संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. कोरोनामुळे लोकांचं आयुष्य जणू थांबलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आलं होतं. गेल्या कित्येक महिन्यांपासून शाळा, कॉलेज उद्योगधंदे सर्व काही बंद आहे.

देशाच्या अर्थव्यवस्थेला लॉकडाऊनचा चांगलाच फटका बसू लागल्यानं नियमांमध्ये शिथिलता देत हळू हळू सर्व देशांनी लॉकडाऊन हटवायला सुरुवात केली आहे. कोरोना महामा.रीमुळे जगभरातील लाखो लोकांनी आपले प्रा.ण गमा.वले आहेत.  या महामा.रीवर लस केव्हा येणार याच गोष्टीकडे सध्या जगभरातील लोकांचं लक्ष लागून आहे. अशातच आता एक सुखद बातमी समोर आली आहे.

कोरोना विषाणू हवेत उपस्थित आहे की नाही हे आता एका मशिनच्या सहाय्याने शोधणं शक्य होणार आहे. आगामी काळात काही ठिकाणी मशीन ठेवून त्या ठिकाणावरील कोरोना विषाणूचा हवेतच शोध घेता येणार आहे. सध्या कॅनडा मधील एक कंपनी हे उपकरण बनवत आहे.

कॅनडा मधील कंट्रोल एनर्जी कॉर्प नावाची कंपनी असं उपकरण तयार करत आहे. या कंपनीनं असा दावा केला आहे की त्यांनी गेम चेंजर उपकरण तयार केलं असून या उपकरणामुळे हवेतील कोरोना विषाणूचा शोध घेता येणार आहे. हे उपकरण शाळा, कॉलेज किंवा ऑफिसमध्ये अतिशय उपयुक्त ठरणार आहेत.

तसेच हे उपकरण एखाद्या ठिकाणी कोरोना विषाणू नाही ना?, याचा ही शोध घेऊ शकणार आहे. त्या जागेवरील हवेत कोरोना उपस्थित नाही याची खात्री झाल्यानंतर हे उपकरण तिथे उपस्थित लोकांची स्वतंत्रपणे तपासणी करू शकेल, असंही या कंपनीनं म्हटलं आहे.

कंट्रोल एनर्जी कॉर्प कंपनी सुरुवातीपासूनच घरातील हवेची गुणवत्ता आणि देखरेखीची उपकरणे बनवत आहे. जगामध्ये कोरोना आपले हातपाय पसरू लागल्यानंतर या कंपनीनं कोरोना व्हायरस डिटेक्षण डिव्हाइस डिझाईन करण्याचं काम सुरु केलं होतं.

‘बायोक्लॉड’ असं या उपकरणाचं नाव आहे. कॅनडा मधील ओंटारियो येथील दोन प्रयोग शाळांमध्ये कंपनीनं कोरोनावर संशोधन केलं आणि त्यानंतर बायोक्लॉड हे उपकरण बनवलं आहे. बायोक्लॉड हे डिव्हाइस एखाद्या हँड ड्रायरसारखं दिसतं. हे उपकरण आसपासची हवा मशीनच्या आतमध्ये खेचतं आणि मग त्या हवेत कोरोनाचा विषाणू आहे का?, याचा शोध घेतं.

कॅनडा मधील वेस्टर्न युनिव्हर्सिटी मधील मायक्रोबायोलॉजीचे प्राध्यापक डेव्हिड हेनरीक्स यांनी या उपकरणाची चाचणी केली आहे. या उपकरणाची किंमत तब्बल 8.8 लाख इतकी असेल. सध्या कंपनी प्रत्येक महिन्याला २० हजार उपकरणे तयार करत आहे. या कंपनीला सध्या जगभरातून ऑर्डर येवू लागल्या आहेत. तसेच बायोक्लॉड हे उपकरण नोव्हेंबर पर्यंत बाजारात येवू शकतं.

महत्त्वाच्या बातम्या-

“हे न.शेत जगणारे नर्कातील किडे आहेत, यांना कोण आपला आदर्श समजणारय?”

ड्र.ग्ज प्रकरणी धक्कादायक बातमी! एनसीबी अधिकाऱ्यानं केला ‘या’ चार बड्या अभिनेत्यांच्या नावांचा खुलासा

‘ड्र.ग्जचाच प्रकार असणारं सीबीडी ऑईल भारतात कायदेशीर करा!’; वाचा कोणी केली ही मागणी

‘त्या’ प्रकरणी कंगना चुकिचीच, कंगनाला खडे बोल सुनावताना उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणाले…

अभिनेत्री कंगणा राणावतचा बीएमसीवर अत्यंत गंभीर आरोप; म्हणाली, माझ्या शेजाऱ्यांना…