काय सांगता! कोरोनाकाळात तब्बल ‘एवढ्या’ सायकली विकल्या गेल्या

नवी दिल्ली | सायकल चालवणे आरोग्यासाठी खूपच उत्तम आहे. मात्र, या तंत्रज्ञानाच्या युगात लोकांना सर्वच गोष्टी सोयीस्कर हव्या असतात. पण काही महिन्यांपूर्वी आलेल्या कोरोनाने लोकांच्या जीवनपद्धतीत आमुलाग्र बदल झाले आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रवास करण्याच्या पद्धतीतही मोठा बदल झाला आहे. काही लोक प्रवास करण्यासाठी आपल्या वाहनांना प्राधान्य देतात पण काही लोक अजूनही सायकल खरेदी करण्यात आवड दाखवत आहेत. मागील 5 महिन्यात सायकलच्या विक्रीत दुप्पट वाढ झालेली दिसत आहे.

ऑल इंडिया सायकल मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (एआयएसएमए) यांच्या अहवालानुसार 2020 मधील सप्टेंबर मध्ये तब्बल 41,80,945 सायकलींची विक्री झाली आहे. एआयएसएमएचे महासचिव केबी ठाकूर यांनी यावर आपलं मत व्यक्त केलं आहे.

सायकल विक्रीत झालेली वाढ ही खूपच अभूतपूर्व आहे. कदाचित इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली असेल. या पाच महिन्यात सायकल विक्रीत 100 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यात काही लोकांना आपल्या आवडत्या सायकलीसाठी थांबावे लागले आहे तर काहींना बुकिंग करावे लागले, असं केबी ठाकूर यांनी म्हटलं आहे.

पुढे ते म्हणाले की, संघटनेच्या आकडेवारीनुसार देशात कोरोना विषाणूचे संक्रमण झाले आणि त्यानंतर टाळेबंदी झाली. मग एप्रिलमध्ये एकही सायकल विकली गेली नाही. मे महिन्यात हाच आकडा 4,56,818 वर जाऊन पोहोचला. पण अगदी पुढच्याच महिन्यात हा आकडा 8,51,060 म्हणजेच दुपटीने वाढला.

त्यातच गेल्या एका महिन्यात हा आकडा 11,21,544 वर जाऊन पोहोचला. फक्त पाच महिन्यात जवळपास 41,80,945 सायकलींची विक्री झाली आहे. एका अहवालानुसार कोरोनाच्या संक्रमणामुळे लोक आपल्या आरोग्य आणि प्रतिकारशक्तीबाबत खूपच सजग झाले आहेत.

सध्या अनलॉक झाल्यापासून वाहनांची संख्या आणि प्रदूषण खूपच कमी झाले. त्यामुळे लोक सायकल चालवण्यासाठी प्रोत्साहित झाले आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे पुष्कळ लोक पहिल्यांदाच सायकल खरेदी करत आहे.

देशात प्रथमच लोकांचा कल सायकलीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात झुकलेला दिसला. सायकल चालवण्यामुळे लोकांच्या आरोग्यात सकारात्मक बदल होईल. तसेच त्यांचे शरीर सुदृढ राहण्यास मदत होईल, जेणेकरून ते निरोगी राहतील. एका माहितीनुसार भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा सायकल निर्मिती करणारा देश आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

बिहारच्या गरजू मुलींना सॅनिटरी पॅड मिळावं म्हणून युवतींनी मिळून केलं ‘हे’ काम

आयपीएल मधील धोनीचा ‘तो’ विक्रम मोडीत काढत विराटनं रचला नवा इतिहास

उपमुख्यमंत्री अजित पवार ‘त्या’ प्रकरणी अडकणार? ईडीची मोठी कारवाई

अखेर एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीतील प्रवेशाच्या मुहूर्तावर सोडलं मौन म्हणाले…

सुशांत प्रकरणी मोठी बातमी! आता सुशांतचा मित्र संदीप सिंहनं उचललं ‘हे’ पाऊल