भारताचा वेस्ट इंडीजवर 59 धावांनी विजय

पोर्ट ऑफ स्पेनः भारतीय कर्णधार किंग विराट कोहलीची शतकी खेळी आणि भुवनेश्वर कुमारच्या वेगवान माऱ्यासमोर कॅरेबियन संघ गारद झाला. भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार वेस्ट इंडीजवर 59 धावांनी विजय मिळवला. सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने  1-0 ने आघाडी घेतली आहे. इंडीजविरुद्धच्या खेळीत भारतीय संघ कोसळणार असं वाटत असताना विराट कोहलीला श्रेयस अय्यरने तोलामोलाची साथ दिली.  

भारताने नाणेफेक जिंकल्यानंतर कोहलीने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेऊन 280 धावांचे लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा सामना करताना वेस्ट इंडिज संघ 210 धावा करु शकला. पावसामुळे वेस्ट इंडीज संघासमोर 46 षटकात 210 धावांचे लक्ष देण्यात आले. 

श्रेयसने चेंडूस धाव या गतीने अर्धशतक करताना केवळ 4 चार चौकार मारले होते. श्रेयसने स्ट्राईक रोटेट करण्यात उत्तम कामगिरी बजावली. 

कोहलीने आपल्या एकदिवसीय सामन्यातील 42 व्या शतकाला गवसणी घातली. त्याचबरोबरच चौथ्या क्रमांकावर कोण? याचे उत्तर मुंबईकर श्रेयस अय्यरने आपल्या अर्धशतकी खेळीतून दिलं आहे.

दरम्यान, गोलंदाजीमध्ये भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी यांनी अनुक्रमे 4 आणि 2 बळी घेऊन वेस्ट इंडीज संघाचं कंबरडं मोडले. वेस्ट इंडीज संघाकडून सलामीवीर इव्हीन लुईस याने 65 धावांची अर्धशतकी खेळी केली.

महत्वाच्या बातम्या-

-पूरात विखुरलेली घरं सावरण्यासाठी संभाजीराजे सरसावले; जाहीर केली 5 कोटींची मदत

-भाजपला जम्मू-काश्मीरमध्ये कोणी आणलं???; मुफ्ती-ओमर अब्दुल्ला यांच्यात शाब्दिक चकमक

-पवार-महाजन वाद भडकला; आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून पोस्टरवर लघुशंका

-रोहित शर्माकडून रिषभ पंतचं नामकरण; ठेवलं हे विनोदी नाव…

-पाक लष्कराला भारतावर हल्ला करण्याचा आदेश द्यावा का?; इम्रान खान यांचा सवाल