मुंबई | बॉलीवूड मधील काही कलाकार व्यावसायिक आयुष्यापेक्षा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींमुळे जास्त चर्चेत असतात. अभिनेता सैफ अली खान आणि त्याचं कुटुंब देखील नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणानं चर्चेत असतं. अशातच आता सैफ अली खानची मुलगी सारा अली खान हिने एका मुलाखती दरम्यान भन्नाट किसा सांगितला आहे.
अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंग या दोघांची सारा मुलगी आहे. सारा खूप लाडात लहानाची मोठी झाली आहे. मात्र, सैफ आणि अमृता सिंगमध्ये वाद झाल्यानं या दोघांनी घटस्फो.ट घेतला. यानंतर सैफने करीना कपूरशी विवाह केला.
जेव्हा करीनाचं नवीन लग्न झालं होतं तेव्हा करीना आपल्याशी कसं वागेल, असं साराला सतत वाटायचं. करीना आणि सैफचं लग्न झाल्यानंतर साराला प्रश्न पडला होता की, करीनाला नक्की कोणत्या नावाने हाक मारावी. हाच किस्सा करीनाने टॉक शोमध्ये सांगितला आहे.
करीनाला बेबो म्हणावं असं साराला वाटत होतं. त्यानंतर आँटी म्हणावं का? असा प्रश्न तिला पडला. शेवटी साराने हा प्रश्न सैफला विचारला. साराचा हा प्रश्न ऐकून सैफ चांगलाच भडकला होता.
तो त्यावेळी साराला म्हणाला की, आँटी कोणाला म्हणतेस? करीनाला आँटी म्हणलं तर तिला ते अजिबात आवडणार नाही. तिला तू आँटी सोडून काहीही म्हण तिला ते आवडेल.
यावेळी सारालाही सैफचे हे म्हणणे पटलं होतं. आता सारा अली खान करीनाला ‘के’ या नावाने हाक मारते. सारा आणि करीना मधील संबंध खूप चांगले आहेत.
दरम्यान, सध्या सारा तिच्या नवीन चित्रपटाच्या प्रमोशनमुळे खूप व्यस्त दिसत आहे. लवकरच सारा अली खान आणि वरुण धवनचा ‘कुली नंबर वन’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. यामुळे सध्या दोघेही प्रमोशनमध्ये बर्यापैकी व्यस्त आहेत. माहितीनुसार, प्रमोशनसाठी सारा अली खान आणि वरुण धवन पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात एन्ट्री करू शकतात.
आजकाल सारा अली खान प्रत्येक व्यासपीठावर पोहोचून तिच्या चित्रपटाची जाहिरात करताना दिसत आहे. सारा अली खान ड्र.ग्जच्या प्रकरणात मीडियापासून लपताना दिसली होती. त्यानंतर आता ती पुन्हा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कॅमेर्यासमोर आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
महिंद्रा कंपनी लवकरंच बंद करणार नुकतीच लॉंच केलेली ‘6 सीटर SUV थार’? वाचा सविस्तर
कंगनाच्या भावाचा लग्नादरम्यानचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पहा व्हिडिओ
दुःखद बातमी! भाजपच्या ‘या’ महिला आमदाराचं नि.धन, राजकीय क्षेत्रात हळहळ
अंकिता अशा प्रकारे सुशांतला ट्रिब्युट देणार; पहा व्हिडिओ
धक्कादायक! ‘त्या’ आत्मह.त्या प्रकरणावरून फडणवीस सरकारवर गंभीर आरोप करत गृहमंत्री म्हणाले…