भाजपला मोठं खिंडार! आणखी एका बड्या महिला नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी

जळगाव | 2019 च्या विधानसभा निवडणुकीपासून भारतीय जनता पार्टीला राज्यात एकामागून एक धक्के सहन करावे लागत आहेत. 2019 नंतर भाजपच्या अनेक बड्या बड्या नेत्यांनी पक्षाला राम राम ठोकत इतर पक्षात प्रवेश केले आहेत. यामुळे भाजपला मोठं खिंडार पडलं आहे.

काही महिन्यांपूर्वी भाजपचे जेष्ठ आमदार आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी देखील भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. एकनाथ खडसे यांच्यानंतर अनेक बड्या नेत्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. अशातच आता खानदेशात भाजपला आणखी एक धक्का बसला आहे.

जळगाव ग्रामीण जिल्हा उपाध्यक्षा अस्मिता पाटील यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. पाटील या भाजपच्या ग्रामीण जिल्हा उपाध्यक्षा आणि बेटी बचाव बेटी पढाव या अभियानाच्या सदस्य देखील  होत्या.

काही वैयक्तिक कारणांमुळे आपण भाजपला राम राम ठोकत असल्याचं अस्मिता पाटील यांनी म्हटलं आहे. अस्मिता पाटील पूर्वी राष्ट्रवादीमध्ये होत्या. त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, आता पुन्हा अस्मिता पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येण्यापूर्वी अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला राम राम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, अलीकडे आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीत महाभारती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजप मध्ये गेलेले अनेक नेते येत्या काळात राष्ट्रवादीत  परततील, असे संकेत राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी दिले आहेत.

येत्या काळात राष्ट्रवादीत मेगा भरती होणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली होती. मुंबईत एका वृत्त माध्यमाशी बोलताना त्यांनी हे संकेत दिले होते.

यावेळी जयंत पाटील म्हणाले होते की, गेले काही दिवस अनेक सदस्य चर्चा करत आहेत. भाजपचे हाताच्या दोन्ही बोटांपेक्षा अधिक सदस्य नाराज आहेत. उबग आलेली आहे. त्यांच्यातील बऱ्याच जणांचा राष्ट्रवादीकडे येण्याचा कल आहे.

याबद्दल लवकरंच निर्णय घेतला जाईल. राष्ट्रवादीत येत्या काळात लवकरंच मेगा भरती होण्याची शक्यता आहे, असं जयंत पाटील यांनी म्हटलं होतं. जयंत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर राजकरणात एकंच खळबळ उडाली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

“मोदी सरकारने शेतकऱ्यांना न्याय तर दिलाच त्याबरोबर पैसा, उत्पादनाला हमीभाव आणि…”

मोठी बातमी! अभिनेते रजनीकांत रुग्णालयात दाखल, जडला ‘हा’ गंभीर आजार

“शरद पवार तुम्ही जाणते राजे नसून विश्वासघातकी राजे”

ममता बनर्जींला मोठा धक्का! पश्चिम बंगालमध्ये कॉंग्रेसची मोठी राजकीय खेळी

प्रियांका गांधींसह अनेक कॉंग्रेस नेत्यांना अटक आणि सुटका