मुंबई | जिओ कंपनी सतत आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन ऑफर्स आणत असते. जिओच्या स्वस्त आणि मस्त ऑफर्समुळे देशभरातील मोबाईल युजर्स जिओच्या सीमकार्डला प्रथम पसंती दर्शवतात. कंपनी देखील आपल्या ग्राहकांची विशेष काळजी घेत असते.
जिओ कंपनीची आपल्या ग्राहकांसाठी असाच एक हटके रिचार्ज प्लान आहे. स्वस्त आणि जास्तीत जास्त फायदा देणारा हा रिचार्ज प्लान आहे. 150 रुपयांपेक्षा देखील स्वस्तमध्ये हा प्लान तुमच्यासाठी उपलब्ध आहे.
कॉलींग असो किंवा इंटरनेट जिओ नेहमीच आपल्या ग्राहकांना स्वस्त रिचार्जच्या ऑफर देत खुश ठेवत असते. कमी किंमतीमध्ये कॉलींग आणि नेट देणाऱ्या प्लान मधील एक प्लान म्हणजे जिओचा 149 रुपयांचा प्लान आहे.
मोबाईल रिचार्जच्या सर्वात स्वस्त प्लान मधील हा एक प्लान आहे. हा प्लान रिचार्ज केल्यानंतर पुढील 24 दिवस वैध असतो. या प्लानमध्ये तुम्हाला दररोज 1 GB डेटा मिळतो. म्हणजेच तुम्हाला या प्लानमध्ये तब्बल 24 GB डेटा वापरायला मिळतो.
तसेच तुम्हाला दररोज 100 SMS देखील करता येतात. तसेच तुम्हाला जिओ टू जिओ किंवा जिओ टू नॉन जिओ देखील फ्री कॉलिंग आहे. या सुविधांसह तुम्हाला आणखीही काही ऑफर्स या प्लानमध्ये देण्यात आलेल्या आहेत.
तुम्ही या प्लानमध्ये काही जिओ अॅप्स फ्रीमध्ये वापरू शकता. जिओ सिनेमा, जिओ सावन यांसारखे अॅप्स तुम्हाला फ्रीमध्ये वापरता येतील. जिओ कंपनी आपल्या ग्राहकांना अनेक धमाकेदार रिचार्ज प्लान ऑफर करत असते. यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये कंपनीने चांगलीच प्रगती केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
- अरे वा!!! वर्षाच्या सुरुवातीलाच सोन्याची झळाळी उतरली, वाचा आजचा दर
- 2021 मध्ये एसयुव्ही गाड्यांचा धुराळा! ‘या’ बड्या कंपन्या करणार अनेक एसयुव्ही लॉंच
- टोयोटानं आणली सर्वात स्वस्त कार; एकदा चार्ज केल्यावर इतकी किमी धावणार!
- …म्हणून पो.लिसांनी आरो.पीच्या अंगावर सोडला सा.प; हलक्या का.ळजाच्या लोकांनी व्हिडीओ पाहू नका!
- मोठी बातमी! सौरभ गांगुली यांना हृदयवि.काराचा झ.टका