रिया चक्रवर्तीच्या काकांचं कोरोनामुळं निधन; पोस्ट शेअर करत म्हणाली…..

मुंबई| कोरोनाच्या दुस-या लाटेने महारौद्ररूप धारण केले आहे. अशा स्थितीत देशातील आरोग्यव्यवस्थाही कमी पडत आहे. ऑक्सिजन सिलेंडर, रेमडेसिवर इंजेक्शन आणि रुग्णासाठी बेड, या सर्व गोष्टींचा मोठा तुटवडा भारतात निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य प्रशासनावर प्रचंड ताण निर्माण झाला आहे.

संपुर्ण देश सध्या कोरोनाच्या भयंकर परिस्थितीशी लढत आहे. त्यातच काही राज्यांमध्ये तर कोरोनाने हाहाकार केला आहे. यामध्ये महाराष्ट्राचाही नंबर लागतो. महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती अद्याप नियंत्रणात आलेली नाही.

अशातच अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्या काकांचं कोरोनामुळे निधन झालंय. याची माहिती रियाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून दिली आहे.

फोटो शेअर करताना अभिनेत्री रियाने कॅप्शनमध्ये लिहिलं, ” एक नामांकित ऑर्थोपेडिक सर्जन, एक सम्माननीय अधिकारी, प्रेमळ पिता आणि एक उत्तम व्यक्ती…करोनाने तुम्हाला आमच्यापासून दूर केलं…परंतू तुमच्या आठवणी कायम आमच्या मनात राहतील…सुरेश अंकल, तुम्ही एक रिअल लाइफ हिरो आहात….तुम्हाला सलाम करते सर!”.

अभिनेत्री रियाचे वडील सुद्धा आर्मीमध्ये कार्यरत होते. ते आता निवृत्त झाले आहेत. त्यामुळे दिवंगत कर्नल सुरेश कुमार हे कदाचित तिच्या वडिलांसोबत काम करत असल्यामुळे त्यांच्यासोबतच रियाची जास्त जवळीक असू शकते.

दरम्यान, सुशांत आत्महत्या प्रकरणातत अभिनेत्री रिया चक्रवर्तीला तुरूंगवास देखील झाला. या सर्व प्रकरणामुळे ती बॉलिवूड विश्वात चर्चेचा विषय ठरली होती.

सुशांतच्या कुटुंबियांनी रियावर अनेक गंभीर आरोप करत सीबीआय चौकशीची मागणी केली. सीबीआयकडून प्रकरणाचा तपास होत असताना यात ड्रग्ज अँगल समोर आला आणि रिया या सगळ्यात अधिक अडकत गेली.

सुशांत सिंह राजपूतच्या आत्मह.त्येनंतर रिया चक्रवर्ती कधी नव्हे इतकी चर्चेत आली होती. त्याच्या निधनानंतर तब्बल सहा महिन्यानंतर रिया महिला दिनी सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह झालेली पहायला मिळाली होती. प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक होते. रियाच्या पोस्टवर शेकडो लोकांनी कमेंट्स केल्या. काहींनी तिला ट्रोल केले. पण काही मात्र रियाची माफी मागताना दिसले.

बाॅलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने 14 जून 2020 ला त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. मात्र त्याची आत्महत्या नसून हत्या करण्यात आल्याचं म्हटलं जात होतं. विशेष म्हणजे ही हत्या त्याची प्रेयसी बाॅलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीने केल्याचा आरोप तीच्यावर केला गेला. तसेच ड्रग्सप्रकरणी रियाला अटक देखील करण्यात आली होती.

 

महत्वाच्या बातम्या – 

‘या’ प्राणीसंग्रहालयातील चक्क 8 सिंहांना झाली…

शोकसभेत रडण्यासाठी ‘या’ अभिनेत्याला मिळाली होती…

कोरोना ग्रस्तांसाठी विराट-अनुष्काची खास मोहिम,…

तळ्यावर पाणी प्यायला गेला बिबट्या; त्यानंतर जे घडलं ते पाहून…

पाठलाग करणं आलं अंगाशी; गेंड्याने रागात असं काही केलं की…