भाजपचे जेष्ठ नेते अरूण जेटली यांचं निधन; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून श्रद्धांजली

नवी दिल्ली | देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपचे जेष्ठ नेते अरूण जेटली यांचं निधन झालं. दिल्लीतल्या एम्स रूग्नालयात 12 वाजून 7 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. 

अरुण जेटली जी एक राजकीय दिग्गज, बौद्धिक आणि कायदेतज्ज्ञ होते. ते एक स्पष्ट नेते होते. ज्यांनी भारतात कायमस्वरूपी योगदान दिले. त्यांचे निधन खूप दुःखद आहे. त्यांच्या पत्नी संगीता जी तसेच मुलगा रोहन यांच्याशी बोललो आणि शोक व्यक्त केला, असं ट्वीट करत मोदींनी शोक व्यक्त केला आहे. 

जेटलींच्या जाण्याने पोकळी निर्माण झालीय, जी कधीही भरून न निघणारी आहे. एक विश्वासू सहकारी गमावला आहे, असं म्हणत मोदींनी जेटली यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

दरम्यान, अरूण जेटली यांच्या निधनाने देशाचं मोठं नुकसान झालंय,अशाच भावना 
भाजपसह विरोधी पक्षातल्या नेत्यांच्याही व्यक्त केल्या आहेत.  
 
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्वीट-

महत्वाच्या बातम्या-