गृहिणींनी बनवलं ‘या’ हिंदी गाण्याचं रिमेक, पाहा व्हायरल व्हिडीओ

मुंबई | आजकाल सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये काही व्हिडीओ डान्सचे असतात. तर काही आपल्या अंगावर काटा आणणारे असतात. त्याचप्रमाणे हल्ली गाण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहत असतो.

त्यामध्ये अनेकवेळा जुनी गाणीच नव्या पद्धतीने कंम्पोज करून ते पब्लिश केले जातात. आपल्याला माहित आहे की, कोणतही गाणं कंम्पोज करणं हे सोपं काम नाहीय. अनेक दिग्गजांच्याही नाकी नऊ येतात. परंतू सध्या व्हायरल होत असलेला व्हिडाओ पाहून तुम्हीही आवाक होऊन जाल.

सध्या सोशल मीडियावर एक गाण्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये चक्क गृहिणींनी गाणं नव्यानं कंम्पोज केलं असल्याचं दिसून येत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तीन महिला असल्याचं पाहायला मिळत आहे.

त्यामधील एकीच्या हातात गिटार आहे. दुसरीच्या हातात वीणा आहे, तर तिसरीच्या हातात घटम असल्याचं दिसून येत आहे. या तिघींनी हिंदी गाण्याचं रिमेक केलं आहे. ते गाणं दुसरं तिसरं नसून ‘सोला साल’ या हिंदी चित्रपटामधील ‘अपना दिल तो आवारा’ हे गाणं आहे.

विशेष म्हणजे या गाण्यामध्या त्यांनी एकाही शब्दाचा वापर केला नाहीये. केवळ गाण्याचा ताल धरून खूप सुंदररित्या गाणं वाजवत आहेत. त्या तिघींकडे पाहून असं वाटत आहे की, गाण्याच्या क्षेत्रामध्ये खूप पारंगत आहेत. शिवाय त्यांचं कोरडिनेशनही चांगलं असल्याचं दिसून येतं आहे.

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ आयपीएस रूपेश शर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी तोंडात बोटं घातली आहेत.

त्याचप्रमाणे या व्हिडीओला अनेक कमेंट आल्या असून, अनेकांनी हा व्हिडीओ शेअरही केला आहे. तसेच या व्हिडीओला आतापर्यंत 533 लोकांनी पाहिलं असल्याचं समजत आहे.

https://twitter.com/rupin1992/status/1425291323129565184

हत्वाच्या बातम्या-

चर्चा तर होणारच! ‘या’ विद्यार्थ्यानं बनवला…

कौतुकास्पद! मोठ्या पगाराची नोकरी सोडून महिला स्मशानात करतेय…

धक्कादायक! कोरोना नष्ट करण्यासाठी देवाला सोडलेल्या घोड्याचा…

2 वर्षाच्या चिमुरड्यासह विवाहित प्रेयसी पोहोचली थेट…

‘या’ विवाहित दिग्दर्शकाला हृदय देऊन बसली होती…