मुंबई | अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने 2016 मध्ये ‘सैराट’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं होतं. चित्रपटातील रिंकूच्या भूमिकेने सर्वांची मने जिंकली होती. हा मराठी चित्रपट देशभरात गाजला होता. या चित्रपटानंतर देखील रिंकूने अभिनय क्षेत्रात आपली वाटचाल चालूच ठेवली. ती अनेक मराठी चित्रपटात काम करत आहे.
रिंकू राजगुरू सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. सोशल मीडियावर आपले वेगवेगळे फोटोज अपलोड करताना दिसते. तिचे चाहते देखील रिंकूच्या फोटोजला भरभरून प्रेम दर्शवत असतात.
सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहणाऱ्या रिंकूने नुकतंच इन्स्टाग्रामवर लाईव्ह येत चाहत्यांशी संपर्क साधला. यावेळी तिने ‘Ask Me Anything’ हा सेशन घेतला. यावेळी चाहत्यांनी रिंकूला वेगवेगळे सवाल केले.
रिंकूच्या एका चाहत्याने तिला तिच्या रिलेशनशिपबद्दल प्रश्न केला. रिंकूने देखील यावेळी बिनधास्त उत्तर दिलं. तुला बॉयफ्रेंड आहे का?, असा सवाल रिंकूच्या एका चाहत्याने तिला केला.
चाहत्याच्या या प्रश्नावर उत्तर देताना रिंकू म्हणाली की, मला बॉयफ्रेंड नाही. मला अजून माझ्या खऱ्या आयुष्यात परश्या मिळालाच नाही. जेव्हा हा खरा परश्या भेटेल तेव्हा मी नक्कीच आनंदाने सर्वांना सांगेल.
दरम्यान, रिंकू लवकरच एका नव्या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचं नाव ‘छुमंतर’ असं आहे. या चित्रपटात रिंकूसह प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना हे कलाकार देखील पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटातील रिंकूची भूमिका सैराट मधील आर्चीच्या भूमिकेप्रमाणे प्रेक्षकांवर जादू चालवणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
तसेच रिंकू ‘झुंड’ या चित्रपटात देखील झळकणार आहे. हा चित्रपट देखील नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात अभिनेता अमिताभ बच्चन हे देखील असणार आहेत. तसेच अभिनेता आकाश ठोसरने देखील यामध्ये काम केलं आहे.
महत्वाच्या बातम्या –
धक्कादायक! बिग बाॅसच्या घरात हाणामारी, घरातून स्पर्धकाला दाखवला बाहेरचा रस्ता
कोरोना काळात ‘अशी’ वाढवा लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती!
खासदार नुसरत जहाँच्या घरी चिमुकल्याचं आगमन!
कोरोनाच्या भीतीनं चक्क माकडानंही लावला मास्क, पाहा व्हिडीओ!
आता अलेक्सावर ऐकायला मिळणार अमिताभ बच्चन यांचा आवाज