शहनाजच्या मांडीवर सिद्धार्थने घेतला अखेरचा श्वास?

मुंबई | अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे गुरुवारी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. सिद्धार्थच्या निधनानंतर मनोरंजन विश्वावर मोठी शोककळा पसरली आहे. सिद्धार्थच्या कुटुंबासह टेलिव्हिजन इंडस्ट्री, सिद्धार्थचे मित्र, त्याचे चाहते सर्वचजण हळहळ व्यक्त करत आहेत. हे दु:ख पचवणे अनेकांसाठी अवघड झाले आहे.

सिद्धार्थच्या मृत्यूनंतर त्याची जवळची मैत्रिण अभिनेत्री शहनाज गीलची अवस्था खूप वाईट झाली आहे. शहनाजला सिद्धार्थच्या मृत्यूचे दु:ख सहन होत नाहीए. या गोष्टीचे सर्वात जास्त दु:ख शहनाजला झाले आहे.

अशातच आता सिद्धार्थने अखेरचा श्वास शहनाजच्या कुशीत घेतला असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर चालू आहेत. बुधवारी रात्री उशीरा सिद्धार्थ आपल्या घरी परतला होता. यावेळी घरामध्ये शहनाज आणि सिद्धार्थची आई होती. यावेळी त्याला बरं वाटत नसल्याचं सिद्धार्थने आईला सांगितलं.

सिद्धार्थला बरं वाटत नसल्याने शहनाज आणि सिद्धार्थच्या आईने त्याला लिंबूपाणी आणि आईस्क्रिम दिले. जेणेकरून सिद्धार्थला बरं वाटेल. मात्र, सिद्धार्थचा त्रास कमी झाला नाही त्याच्या छातीत दु:खतच होते. यामुळे सिद्धार्थच्या आईने त्याला आराम करण्यास सांगितले.

सिद्धार्थला बरं वाटत नसल्याने शहनाज देखील त्याच्यासोबत त्याच्या रुममध्ये गेली. सिद्धार्थ शहनाजच्या मांडीवर डोकं ठेवून झोपी गेला. सिद्धार्थची झोप लागेपर्यंत शहनाज त्याची पाठ थोपटत राहिली. काही वेळाने शहनाजची देखील झोप लागली.

सकाळी 7च्या सुमारास ज्यावेळी शहनाज उठली त्यावेळी सिद्धार्थची काहीच हालचाल होत नव्हती. तिने सिद्धार्थला उठवण्याचा प्रयत्न केला पण तो उठला नाही. यामुळे शहनाज धावत खाली आली आणि तिने सर्वांना ही गोष्ट सांगितली. यानंतर तातडीने सिद्धार्थला दवाखाण्यात दाखल करण्यात आलं. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं, असं बोललं जात आहे.

दरम्यान, शहनाज आणि सिद्धार्थ दोघे बिग बॉसच्या 13व्या सीझनमध्ये एकत्र दिसले होते. बिग बॉस मधील शहनाज आणि सिद्धार्थची मैत्री सर्वांनाच खूप आवडली. शोदरम्यान या दोघांमध्ये अनेकवेळा वाद झाले, मतभेद झाले, तरी देखील हे दोघे नेहमी एकमेकांच्या जवळ राहिले. त्यामुळे ही जोडी सर्वांची फेवरेट राहिली.

या दोघांच्या जोडीला चाहत्यांनी सिदनाज असं नाव दिलं होतं. या दोघांचं बॉन्डिंग केव्हा केव्हा प्रेक्षकांच्या देखील डोळ्यात अश्रू आणणारं ठरलं. मात्र, आता ही सिदनाजची जोडी आपल्याला केव्हाच एकत्र पाहायला मिळणर नाही.

महत्वाच्या बातम्या-

सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शहनाजची अवस्था पाहून तुम्हाला देखील अश्रू अनावर होतील, पाहा फोटो

‘या’ बड्या अभिनेत्रींसोबत रिलेशनशीपमध्ये होता सिद्धार्थ शुक्ला

‘या’ सीनमुळे नॅशनल क्रश रश्मिका मंदानाला स्लट शेमिंगला सामोर जावं लागलं

पाण्यात उडी मारायला गेला अन्…, पाहा काळजाचं पाणी करणारा व्हिडीओ

‘सिद्धार्थचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे होऊ शकत नाही’, सिद्धार्थच्या जिम ट्रेनरचा खळबळजनक दावा