सिद्धार्थच्या मृत्यूनंतर आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

मुंबई | अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने गुरुवारी या जगाचा अखेरचा निरोप घेतला आहे. सिद्धार्थच्या अचानक जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. अद्याप देखील अनेकांचा या गोष्टीवर विश्वास बसत नाही. सिद्धार्थने अगदी कमी वयात प्रचंड लोकप्रियता आणि संपत्ती मिळवली आहे. सिद्धार्थने टेलिव्हिजन इंडस्ट्रीत आपली वेगळी छाप निर्माण केली आहे.

सिद्धार्थ हा त्याच्या आईसाठी एकुलता एक मुलगा होता. त्याच्या आईसाठी आपल्या तरुण मुलाचं अकाली निधन होणं हा खूप मोठा धक्का आहे. परंतु त्यातून देखील त्याची आई स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करत आहे.

सिद्धार्थच्या निधनानंतर बिग बॉसचा विजेता आणि गायक राहुल वैद्य ज्यावेळी सिद्धार्थच्या आईला भेटायला गेला त्यावेळी त्यांची अवस्था कशी होती, याबद्दल राहुलने एक व्हिडीओ शेअर करत माहिती दिली आहे.

राहुलने सांगितलं की, जेव्हा ही बातमी समजल्यानंतर मी सिद्धार्थच्या आईला भेटायला गेलो तेव्हा त्या म्हणाल्या की, आयुष्यात ऐकलेलं की कोणाचा तरी तरूण मुलगा गेला. परंतु हे माझ्यासोबत होईल, असं मला वाटलं नव्हतं.

माझा तरुण मुलगा गेला आता मी कोणासाठी जगू, असं त्या बोलत आहेत. तसेच शहनाजची अवस्था देखील खूप वाईट आहे. ती काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती, असंही राहुलने यावेळी सांगितलं आहे.

दरम्यान, सिद्धार्थने 2004 साली आपल्या मॉडेलिंग करिअरला सुरूवात केली होती. सिद्धार्थला मॉडेलिंग आणि अभिनयामध्ये फारशी आवड नव्हती. परंतू त्याच्या लूकमुळे केवळ आईच्या सांगण्यावरून त्यानं एका मॉडेलिंग स्पर्धेत भाग घेतला. तिथून त्याच्या करिअरला सुरूवात झाली.

डिसेंबर 2005मध्ये तुर्कीमध्ये मॉडेलिंगची स्पर्धा झाली होती. त्यामध्ये आशिया लॅटिन, अमेरिका, यूरोपमधील एकूण 40 जणांनी सहभाग घेतला होता. या 40 जणांना मागे टाकत सिद्धार्थने जगातील सर्वोत्कृष्ट मॉडेलंच विजेते पद पटकावलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

कतरीना कैफ आणि विकी कौशल डिसेंबरमध्ये ‘या’ ठिकाणी लग्नबंधनात अडकणार?

सिद्धार्थ आणि शहनाजने गुपचूप उरकला होता साखरपुडा, डिसेंबरमध्ये करणार होते लग्न?

सिद्धार्थ आणि शहनाजच्या नात्याविषयी राहुलने केला मोठा खुलासा म्हणाला, ते दोघे…

ऐकावं ते नवलंच! चक्क पक्षी रडतोय लहान बाळासारखा, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल चकीत

बॉयफ्रेंडसोबत स्टंट करणं तरूणीला पडलं महागात, पाहा व्हिडीओ