राष्ट्रवादीचा आणखी एक मावळा शिवसेनेच्या किल्ल्यावर??? उद्धव ठाकरेंची घेतली भेट

मुंबई |  राष्ट्रवादीचे कोकणातील दिग्गज नेते भास्कर जाधव यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. मातोश्रीवर झालेल्या भेटीत या दोघांमध्ये तब्बल 1 तास चर्चा रंगली. त्यामुळे राष्ट्रवादीचा आणखी एक मावळा शिवसेनेच्या किल्ल्यावर जाणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू  झाल्या आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुणी काँग्रेसचा ‘हात’ झिडकारून तर कुणी मनगटावरचं ‘घड्याळ’ काढून सत्ताधारी सेना भाजपच्या गोटात दाखल होत आहेत. त्यात आता भास्कर जाधव यांचा समावेश होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

भास्कर जाधव कोकणातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातलं मोठं नाव आहे. निवडणुकीच्या तोंडावर तेसुद्धा पवारांची साथ सोडून सेनेमध्ये दाखल होणार आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे दिलीप सोपल देखील शिवसेनेच्या वाटेवर आहेत. भास्कर जाधव यांनी जर सेनेमध्ये प्रवेश केला तर कोकणात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे.

महत्वाच्या बातम्या-