मेरठ | राजकारण म्हटलं की आरोप-प्रत्यारोप हे पहायला मिळत असतात. अशातच ऐन निवडणुकीत तर राजकीय वर्तुळात अनेक खलबतं पहायला मिळतात. निवडणूका जवळ आल्यावर राजकारण नेहमीच तापलेलं असतं.
उत्तर प्रदेशमध्ये सध्या विधानसभा निवडणूक 2022 ची रणधुमाळी पहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक हालचाली सुरु आहेत. अशातच एका काँग्रेसच्या उमेदवाराचे बोल्ड फोटो व्हायरल होत आहेत.
हस्तिनापूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार अर्चना गौतम यांचे बोल्ड फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे अर्चना गौतम या सध्या चांगल्यात चर्चेत आल्या आहेत.
13 जानेवारी रोजी काँग्रेसने यूपी विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली. यामध्ये अर्चना गौतम यांना हस्तिनापूर मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे.
काॅंग्रेसच्या उमेदवारीचं तिकीट दिल्यापासून त्यांचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. याशिवाय यांना का तिकीट दिलं, असं म्हणत अनेकांनी त्यांना ट्रोलही केलं आहे.
याविषयी बोलताना अर्चना गौतम यांनी म्हटलं की, मी मिस बिकिनी 2018 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलं आहे. मी मिस उत्तर प्रदेश 2014 आणि मिस कॉस्मो वर्ल्ड 2018 राहिली आहे. मी लोकांना आवाहन करते की, माझा प्रोफेशन आणि राजकीय करियरला एकत्र करू नका.
उत्तर प्रदेश हे देशातील सर्वात मोठे राज्य आहे. या राज्याचा कौल देशाचा मूड सांगणारा असतो. त्यामुळेच तिथे जोरदार घमासान होणार असल्याचं चित्र आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
महत्त्वाच्या बातम्या –
Petrol-Diesel Price: पेट्रोल- डिझेलचे नवे दर जाहीर, वाचा आजचे ताजे दर
‘या’ देशात मास्क आणि लसीपासून सूटका, सरकारचा मोठा निर्णय
कॉमेडी किंग कपिल शर्माच्या जीवनावर चित्रपट, ‘हे’ असणार नाव
त्वचेवर ‘अशी’ लक्षणं दिसल्यास करु नका दुर्लक्ष, असू शकतो Omicron?
संतापजनक! पुन्हा सुरु झालेल्या एसटीवर दगडफेक, प्रवासी थोडक्यात बचावले