“नान्या सापडला काय तो गावगुंड?, सापडला असेल तर फटकन जावई करून घे”

अमरावती | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलेल्या वक्तव्यामुळं भाजप आक्रमक झाली आहे. नाना पटोलेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची यांच्या बद्दल वापरलेली भाषा आक्षेपार्ह असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी म्हणून भाजप नेते आक्रमक झाले आहेत.

अनिल बोंडे (Anil bonde) यांनीही नाना पटोलेंवर टीकेची झोड उडवली आहे. त्यांनी नाना पटोलेंना सकाळी थेट पंजा छाटण्याचा इशारा दिला होता, आता तर थेट नान्या गुंडाला जावाई करून घे अशी जहरी टीका केली आहे.

नाना पटोलेंवर टीका करताना, बोडेंनी ट्विट करत, नान्या सापडला काय तो गावगुंड? सापडला असेल तर फटकन जावई करून घे कामात येईल काँग्रेसच्या, रॉबिन वाड्रा सारखा…असा घणाघात केला आहे.

आता काँग्रेस आक्रमक पवित्रा घेण्याची दाट शक्यता आहे. बोंडेंनी टीका करताना नाना पटोलेंना नान्या म्हणत, त्यांचा एकेरी उल्लेखही केला आहे. नाना पटोलेंच्या त्या वक्तव्यावरून राज्यात सध्या भाजप आणि काँग्रेस आमनेसामने आले आहे.

काँग्रेस नेत्यांमध्ये कुत्र्यांसारखी भुंकायची स्पर्धा लागली आहे. सोनिया गांधी यांना खुष करण्यासाठी मोदींवर किती भुंकायचे याची शर्यत लागली आहे. नाना पटोले याने तर हद्दच केली मी मालकीणीचा सगळ्यात प्रामानिक कुत्रा आहे. म्हणून दाखविण्यासाठी भुंकण्यासोबतच चावण्याचाही धमकी दिली. पण, नानांनी लक्षात ठेवावं शाहिस्तेखानाची नुसती बोटच छाटली होती तुझा पंजाच छाटलाच जाईल, असा इशारा अनिल बोंडे यांनी दिला आहे. उगीचच गमच्या मारू नको अमरावती वरून पोर निघाले आहेत पंजा सांभाळून ठेव, असा इशारा बोंडे यांनी सकाळी दिला होता.

दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या मोदींबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. भाजप कार्यकर्त्यांकडून पटोलेंविरोधात राज्यभरात आंदोलन करण्यात आलं. तर मुंबई भाजपकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांना निवेदन देत कारवाईची मागणीही करण्यात आली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी पटोलेंवर जोरदार टीका करत त्यांच्या अटकेची मागणी केलीय.

महत्त्वाच्या बातम्या – 

“नाना पटोलेंच्या वक्तव्यावर राहुल गांधी गप्प का?” 

“…कुछ नन्हें पटोले”; अमृता फडणवीसांची पटोलेंवर शायराना अंदाजात टीका

“नानांनी तर हद्दच केली, मालकिणीचा सगळ्यात प्रामाणिक कुत्रा दाखवण्यासाठी…”

“नाना पटोलेंनी राजीनामा द्यावा अन् येरवड्यात दाखल व्हावं” 

“शरद पवार साहेबांनी मेट्रोतून चक्कर मारून आणा असा हट्ट केला का?”