मुंबई | भारत आणि दक्षिण अफ्रिका (INDvsSA) यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना आज खेळला जात आहे. बोलंड पार्कच्या पर्लवर हा सामना खेळला जातोय.
आजचा सामना भारतीय संघासाठी करो या मरो असणार आहे. पहिला सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता.
टीम इंडियाचा कर्णधार केएल राहुलने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. यानंतर भारताने 50 ओव्हरमध्ये 287 धावापर्यंत मजल मारता आली आहे. आजच्या सामन्यात भारतीय फलंदाजांना जास्त वेळ टिकता आलं नाही.
रिषभ पंतने आणि शार्दुल ठाकूर वगळता कोणत्याही फलंदाजांना मोठी पारी खेळता आली नाही. तर चॅम्पियन विराटला देखील आज भोपळा फोडता आला नाही. विराट आज शुन्यावर बाद झाला.
सलामीवीर शिखर धवन देखील आज लवकर बाद झाला होता. सामन्यादरम्यान कोहली शिखर धवनच्या शेजारी बसून नाचत होता. त्यांच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
शिखर धवनलाही मैदानावर अनेकदा हसताना आणि विनोद करताना दिसले आहे. यावेळी दोघांनी एकत्र बसून मजा घेतली. विराटला खूप काळानंतर मस्ती करताना पाहून आता विराटचे चाहते देखील खुश आहेत.
कोहली त्याच्याकडून काहीतरी ऐकत नाचत असताना धवन त्याच्याकडे बघत हसत आहे. लेगस्पिनर युझवेंद्र चहलही या भारतीय सलामीवीर फलंदाजाच्या शेजारी बसला होता.
दरम्यान, भारतीय संघाने दिलेलं 288 धावांचं टार्गेट पार करताना भारताची स्थिती चिंताजनक दिसत आहे. नुकतंच हाती आलेल्या वृत्तानुसार 26 षटकात दक्षिण अफ्रिकेच्या 160 धावा झाल्या आहेत.
पाहा व्हिडीओ-
Virat kohli is such a mood 🤣✨ pic.twitter.com/yjC6XTlJIw
— Siddhi 🙂 (@_sectumsempra18) January 21, 2022
महत्त्वाच्या बातम्या –
भाजपला दे धक्का! मनोहर पर्रिकरांच्या मुलाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
Sushant Singh Rajput: अभिनय सोडून सुशांत करणार होता हे काम, मोठी माहिती हाती
“शरद पवारांचा हा ढोंगीपणा, ज्या छगन भुजबळांना राष्ट्रवादीत घेतलं त्यांनीच…”
“मी कशाला त्यांची भेट घेऊ? आतापर्यंत कधीच शरद पवारांच्या…”
नरेंद्र मोदींची मोठी घोषणा! इंडिया गेटवर उभारणार सुभाष बाबूंचा भव्य पुतळा