अजून किती दिवस हे सहन करायचं, त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे- अजित पवार

मुंबई | तुम्ही तुमचं घर, जिल्हा आणि राज्य सोडता. पोटाची खळगी भरण्यासाठी इथं येता आणि मराठीचा (Marathi) द्वेष करायचा हे बरं नव्हं, मराठी मनाचा, संवेदनशीलतेचा अंत पाहू नका. मुख्यमंत्री महोदय मराठी द्वेष्ट्यांचा बंदोबस्त केला पाहिजे, किती दिवस सहन करायचं, असं उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटलं आहे.

मराठी (Marathi) भाषा दिनानिमित्त मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), अजित पवार (Ajit Pawar), उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अजित पवार बोलत होते.

पुढील काळात प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकाचं गाव तयार करण्याची भूमिका आहे. मराठी ही ज्ञान भाषा झाली पाहिजे. मराठीची उपयुक्तत्ता वाढवली पाहिजे यासाठी प्रयत्न चालवला आहे. मराठी भाषेची उपयुक्तता वाढवल्याशिवाय आपणही गप्प बसणार नाही, असं अजित पवार म्हणाले.

आपण दुकानावर मराठी पाट्या लावण्याचा निर्णय घेतला तर कुणीतरी मराठी द्वेष्टे महाभाग न्यायालयात गेले. दुकानावर मराठी पाट्या लावाव्यात, स्थानिक भाषा सोईची असती, असं मराठी द्वेष्ट्यांना न्यायालयानं सुनावलं. त्यांना एकचं सांगणं आहे, आमच्या मराठी भाषेला, विरोध कशाला करता, असंही अजित पवार म्हणालेत.

धावपळीच्या युगात कुटुंब लहान होत आहेत. आजी आजोबांचा सहवास नवीन पिढीला कमी मिळतोय.इंग्रजी भाषा ही संधी देणारी हा संभ्रम दूर करावा लागेल. मराठी देवनागरीतून व्यक्त होते. केवळ एकमेकांशी मराठीत बोलल्यानं मराठी भाषेचं संवर्धन होईल, या भाबड्या आशेतून आपल्याला बाहेर पडलं पाहिजे, असंही ते म्हणालेत.

सरकारवर केवळ अवलंबून न राहता लोकांनी पुढं आलं पाहिजे. मराठी साहित्य, मराठी नाटक, सिनेमा निश्चित चांगले प्रयत्न करतात. साहित्य महोत्सवापेक्षा खाद्य महोत्सवामध्ये गर्दी का जास्त असते याचा विचार करावा लागेल. स्टोरी टेल सारख्या संकल्पना आपल्याला स्वीकाराव्या लागतील, असं माझं मत आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

“…तर धैर्यवर्धन पुंडकरांच्या घरासमोर हात कलम करेन”

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; मोदी सरकार लवकरच ‘हा’ निर्णय घेणार 

“अजूनही वेळ गेली नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विचार करावा” 

समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल?- भगतसिंह कोश्यारी 

रशिया-युक्रेन युद्धावर आठवलेंची कविता, म्हणाले ‘पुतीनचा बिघडला आहे ब्रेन म्हणून…’