“राज्यातील महाविकास आघाडी सरकार 5 वर्ष टिकणार”, शरद पवारांना विश्वास

मुंबई | राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला राज्यात चालू असलेल्या अनेक गैरप्रकारांवरून लक्ष्य केलं. फडणवीसांनी विधानसभा अध्यक्षांना पुरावे सादर केल्यानं एकच खळबळ उडाली होती.

महाजन यांच्यावर मोक्का लावण्यासाठी विशेष वकीलांनी एक मास्टर प्लॅन तयार केला होता. या प्लॅनसाठी भाजपमधून सत्ताधारी पक्षात आलेल्या एका नेत्यानंही मदत केल्याचं फडणवीस म्हणाले आहेत.

त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांवर देखील टीका केली होती. त्यावर आता शरद पवारांनी उत्तर दिलं.

देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांचा काही भाग समजला नाही. सरकारी अधिकाऱ्यांचं 125 तासांचं रेकॉर्डिंग होतं, हे कौतुकास्पद असल्याची टीका शरद पवारांनी केली आहे.

केंद्रीय यंत्रणांचा वापर केल्याशिवाय सरकारी अधिकाऱ्यांचं 125 तासांचं रेकॉर्डिंग शक्य नाही, असंही शरद पवार म्हणाले आहेत.

आरोपांची राज्य सरकारने चौकशी करावी. माझे अप्रत्यक्षपणे नाव घेतलं गेलं. पण यात माझा काही संबंध नाही, असं स्पष्टीकरण देखील पवारांनी दिलंय.

सत्ताधाऱ्यांना नाऊमेद करण्याचा हा सगळा प्रयत्न आहे. पण सरकारला कुणीही धक्का लावू शकत नाही. सरकार 5 वर्षे टिकेल, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“…पण कदाचित अश्विनबद्दल बोलताना रोहितची जीभ घसरली”

पुतीनचं टेन्शन वाढलं! अमेरिकेने रशियाविरूद्ध घेतला ‘हा’ मोठा निर्णय

“महाविकास आघाडी सरकारला कुणीही धक्का लावू शकणार नाही” 

देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या आरोपांनंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…’माझ्याकडे पण…’ 

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी!