मुंबई | आयपीएल (IPL) स्पर्धा सुरू होऊन आता आठवडा होत आहे. दररोज नवीन काहीतरी घडत जात आहे. परिणामी आयपीएलचा रोमांच देखील वाढतोय.
आयपीएलमध्ये आपल्या कमालीच्या दिमाखदार खेळीनं सर्वांची मनं जिंकणारा केकेआरचा अष्टपैलू खेळाडू व्यंकटेश अय्यर आता वेगळ्याच कारणानं व्हायरल होत आहे.
आयपीएलवर असणारं कोरोनाचं सावट लक्षात घेता आपल्या राहाण्याची व्यवस्था केलेल्या ठिकाणी आणि मैदानातच खेळाडू मस्ती करताना सध्या पाहायला मिळत आहेत.
व्यंकटेश अय्यर आपल्या संघ सहकाऱ्यासोबत मैदानात मज्जा करताना दिसत आहे. फोटो काढण्याचा आग्रह करणाऱ्या आपल्या सहकाऱ्याला अय्यर वेगळ्याच अंदाजात पहायला मिळाला आहे.
व्यंकटेश अय्यर डब्लूडब्लूई स्टार महान अंडरटेकरची नक्कल करत सहकाऱ्याला उचलतो आणि खाली फेकतो. अंडरटेकरच्या भूमिकेतील अय्यरला सर्वजण पसंत करत आहेत.
माझा हा व्हिडीओ पाहून अंडरटेकरनं मला साईन केलेला बेल्ट पाठवावा अशी ईच्छा देखील अय्यरनं व्यक्त केली आहे. अय्यर अंडरटेकरचा मोठा फॅन आहे.
अंडरटेकरला द डेडमॅन नावानं सर्वत्र ओळखलं जातं. 2020 मध्ये अंडरटेकरनं इन रिंगमधून निवृत्ती घेतली होती. सध्या अंडरटेकरची हवा मात्र आयपीएलमध्ये पहायला मिळत आहे.
पाहा व्हिडीओ –
View this post on Instagram
महत्त्वाच्या बातम्या –
Gold Rate: सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रुपयांची घसरण, वाचा ताजे दर
“शिवसेनेच्या 18 खासदारांपैकी 14 खासदार भाजपच्या संपर्कात”
“पैसे जपून खर्च करा, चिकन खरेदी करायला गेलात तरी भाजप ईडीला कळवेल”
लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती आली समोर, रेल्वेनं घेतला मोठा निर्णय