‘ये दोस्ती हम नहीं तोडेंगे’ गाण्यावर खडसे-सोमय्यांची धमाकेदार एन्ट्री; पाहा व्हिडीओ

मुंबई | झी मराठी (Zee Marathi) या वाहिनीवरचा किचन कल्लाकार (Kichan kallakar) हा कार्यक्रम सर्वांना आवडतो. हा कार्यक्रम आता घराघरात पोहोचला आहे. या कार्यक्रमात अनेक प्रमुख पाहुण्यांना बोलवलं जातं.

किचन कल्लाकार या शोचे महाराज म्हणजेच प्रशांत दामले (Prashant Damle) पाहुण्यांसोबत गप्पा मारताना दिसतात अनेक गोष्टींवर या कार्यक्रमात चर्चा होत असते. या शोचा पुढील प्रोमो सध्या रिलीज करण्यात आला आहे.

राजकीय क्षेत्रातील व्यक्ती अनेकदा या कार्यक्रमात आलेले पहायला मिळतं. रोहित पवार, देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, किशोरी पेडनेकर, चित्रा वाघ यांसाऱख्या अनेक कलाकार या कार्यक्रमात हजेरी लावत असतात.

अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी या कार्यकर्मात हजेरी लावली. त्यावेळी दोघांची एन्ट्री पाहण्याजोगी होती.

ये दोस्ती हम नहीं तोडेंगे, या गाण्यावर दोन्ही नेत्यांनी धमाकेदार एन्ट्री मारली. या गाण्यादरम्यान ते दोघेही मिठी मारुन डान्स करताना दिसले. त्यावेळी अनेत खेळ देखील खेळण्यात आले.

कार्यक्रमात शिवसेना खासदार संजय राऊत यांचा फोटो दाखवण्यात आला आणि दोघांना गाणं म्हणायला लावलं. त्यावेळी खडसेंनी दोन्ही दंड दाखवत आ देखे जरा किसमे कितना है दम, असं गाणं म्हटलं.

तर सोमय्या यांनी या फोटोवर पहिल्यांदा नो कमेंट्स म्हणत साफसफाईला सुरूवात केली आहे, असं म्हटल्याचं पहायला मिळत आहे. दरम्यान, बुधवारी आणि गुरूवारी हा एपिसोड सर्वांना पहायला मिळणार आहे.

पाहा व्हिडीओ-


महत्त्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! गोपीचंद पडळकरांच्या भावाच्या गाडीचा भीषण अपघात; तातडीने रूग्णालयात हलवलं

महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलला भाजपकडून ‘इतक्या’ लाखांची मदत जाहीर; भव्य सत्कार करणार

राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

‘तुम्हाला बजावून सांगतोय की…’; अमित शहांवर प्रकाश राज भडकले

जितेंद्र आव्हाडांच्या आरोपाने खळबळ, म्हणाले ‘शरद पवार साहेबांना….’