Stock Market: शेअर मार्केटमध्ये घसरण, गुंतवणूकदारांना मोठा झटका

मुंबई | मागील काही दिवसांपासून शेअर बाजारात (Stock Market) अस्थिरता कायम असल्याचं पहायला मिळत आहे.

आजही शेअर मार्केच कोसळल्याचं दिसत आहे. आज जागतिक शेअर बाजारातील पडझडीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. सेन्सेक्स  850 अंकांनी कोसळला आहे.

निफ्टीतही 250 हून अधिक अंकाची घसरण पहायला मिळाली. अमेरिकन आणि आशियाई शेअर बाजारात घसरण झाल्यानं हा परिणाम दिसत आहे.

सेन्सेक्स 773.94 अंकानी म्हणजे जवळपास 1.39 टक्क्यांची घसरला आहे. तर सेन्सेक्स आज 54,928.29 अंकावर सुरू झालेला पहायला मिळाला.

या घसरणीमुळे काही मिनिटांत गुंतवणूकदारांना 5.12 लाख कोटींचा फटका बसला. मागील सत्रातील 249.64 लाख कोटी रुपयांच्या तुलनेत आज गुंतवणूकदारांची संपत्ती 5.12 लाख कोटी रुपयांनी कमी होऊन 254.52 लाख कोटी रुपयांवर आली.

दरम्यान, आंतराष्ट्रीय बाजारात देखील संमिश्र वातावरण पहायला मिळत आहे. त्यामुळे परदेशी गुंतवणूक कमी होत असल्याचं दिसतंय. त्याचा थेट परिणाम बॅकिंग आणि फायनान्स सेक्टरवर होताना दिसतोय.

महत्त्वाच्या बातम्या – 

  ‘अब चंपाकली मुरझायी हैं’; संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा

  उष्णतेच्या लाटेविषयी हवामान विभागाचा गंभीर इशारा, म्हणाले…

  राज ठाकरेंच्या अडचणी वाढणार?; समोर आली ‘ही’ महत्त्वाची माहिती

  “मी भाजपसोबत असताना भाजपला मनसेची गरज नाही”

  कोरोनामुळे देशात ‘इतक्या’ लाख लोकांचा मृत्यू, WHO च्या दाव्यानं खळबळ