काँग्रेसला मोठा धक्का, ‘या’ नेत्याने दिला तडकाफडकी राजीनामा

औरंगाबाद : कॉंग्रेस नेते राजेश दर्डा यांनी कॉंग्रेसच्या प्रसारमाध्यम आणि संपर्क कमिटीच्या चेअरमनपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे कॉंग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. राजेंद्र दर्डा सलग 15 वर्षे आमदार राहीले आहेत, तसचं त्यांनी वेगवेगळी मंत्रीपदे भूषवली आहेत. 

राजेंद्र दर्डा ‘लोकमत’ सारख्या मोठ्या दैनिकाचे मालक देखील आहेत. वैयक्तीक अडचण असल्यामुळे आपण या कमिटीतून बाहेर पडत आहे, असं दर्डा यांनी म्हटलं आहे. आपल्या पदाचा राजीनामा त्यांनी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे सुपूर्त केला आहे.

दुसरीकडे कराडमध्ये कॉंग्रेसला खिंडार पडणार आहे. निवडणुकीच्या पाश्वभूमीवर कॉंग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का बसणार आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय कॉंग्रेसचे विधान परिषदेचे विद्दयमान आमदार आनंदराव पाटील यांचे पुत्र प्रताप पाटील, पुतणे आणि कराड कृषी उत्पन्न बाजार समितिचे माजी उपसभापती सुनील पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं समजतंय.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेस पक्षाला धक्क्यावर धक्के बसत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –