भोपाळ | काँग्रेसचे राज्यसभा खासदार दिग्विजय सिंह (Digvijay Singh) यांच्यासह 6 जणांना एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयाने सर्व 6 दोषींना प्रत्येकी 5000 रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
विशेष न्यायाधीश मुकेश नाथ यांनी दिग्विजय आणि उज्जैनचे माजी लोकसभा खासदार प्रेमचंद गुड्डू यांना भारतीय दंड संहिता (IPC) कलम 325 आणि 109 अंतर्गत दोषी ठरवलं. तर अनंत नारायण, जयसिंग दरबार, अस्लम लाला आणि दिलीप चौधरी या इतर चार जणांना कलम 325 अंतर्गत दोषी ठरवण्यात आलं आहे.
हा खटला 17 जुलै 2011 चा आहे. त्यावेळी उज्जैनमध्ये बीजेवायएम कार्यकर्त्यांनी दिग्विजय सिंह आणि काँग्रेस नेत्यांना काळे झेंडे दाखवले होते.
संतप्त झालेल्या दिग्विजय आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी बीजेवायएमच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. यामध्ये बीजेवायएमशी संबंधित कार्यकर्ता अमय आपटे हा गंभीर जखमी झाला. त्यानंतर या प्रकरणी हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
दिग्विजय आणि गुड्डूचे वकील राहुल शर्मा यांनी सांगितले की, त्यांच्या दोन्ही क्लाईंट्सना बीजेवायएम कार्यकर्ते रितेश खाबियाला मारहाण करण्यासाठी इतरांना चिथावणी दिल्याबद्दल शिक्षा सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, उज्जैन जिल्ह्यातील तराना भागातील काँग्रेस आमदार महेश परमार, मुकेश भाटी आणि हेमंत चौहान या प्रकरणातील अन्य तीन आरोपींना न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केलं.
दिग्विजयसह सर्व सहा दोषींच्या अपीलवर, विशेष न्यायाधीशांनी तात्काळ त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आणि 25,000-25,000 रुपयांच्या जामिनावर त्यांची सुटका केली.
महत्त्वाच्या बातम्या-
“बास झाला त्रास, आता ठाकरे-पवारांना सांगणार आहे”
“बायको, मेहुणा नाहीतर चहापेक्षा किटली गरम पीए मंत्र्यांना अडचणीत आणतात”
गरिबांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा!
IPL 2022 | श्रेयसच्या KKR ची विजयी सलामी; चेन्नईचा पराभव
‘सेलिब्रिटी होणं इतकं सोपं नसतं’; हेमांगीनं शेअर केला ‘तो’ व्हिडीओ