मुंबई | यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात त्यांना एक डायरी मिळाली असून, यातून त्यांच्या व्यवहाराची पोलखोल झाली आहे.
‘मातोश्री’ला 50 लाखांचं घड्याळ पाठवलं, अशा नोंदी आहेत. याबाबत आयकर विभागाने जाधवांकडे चौकशी केली. मात्र, त्यांनी चलाखीने या विषयाला बगल देत डायरीतील ‘मातोश्री’ हा उल्लेख म्हणजे आपली आई असल्याचं म्हटलं आहे.
आपल्याला दानाची 2 कोटी रुपयांची रक्कम मिळाली. याचा वापर मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या भेटवस्तू देण्यासाठी केला. माझ्या आईच्या नावावर लोकांना घड्याळांचे वाटप केल्याचा दावा त्यांनी केला.
दुसरीकडे मुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या घराचं नावही ‘मातोश्री’ आहे. त्यामुळे या उत्तरावर आयकर विभागाचे समाधान झालं नसल्याचं कळतंय.
आगामी महापालिका निवडणुकांच्या निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना नेते यशवंत जाधवांवर आयकर विभागाकडून करण्यात आलेली कारवाई शिवसेनेसाठी धक्का समजली जात आहे.
जानेवारी महिन्यात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. मुंबईतील कोविड सेंटर उभारणीत मोठा घोटाळा केल्याचा आरोप केला होता.
यामध्ये मनी लॉन्ड्रिंग केल्याचाही गंभीर आरोपही सोमय्यांनी जाधवांवर केला होता. एवढंच नाहीतर आयकर विभागाच्या हाती पुरावे लागले आहेत.
जाधव यांचं पितळ उघडं करण्यासाठी आयकर विभागाला पाठपुराव्यास मदत करणार असल्याचंही किरीट सोमय्या म्हणाले होते. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाल्याचे पाहायला मिळाले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याला मोठा झटका; न्यायालयानं सुनावली ‘इतक्या’ वर्षाची शिक्षा
“बास झाला त्रास, आता ठाकरे-पवारांना सांगणार आहे”
“बायको, मेहुणा नाहीतर चहापेक्षा किटली गरम पीए मंत्र्यांना अडचणीत आणतात”
गरिबांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा!
IPL 2022 | श्रेयसच्या KKR ची विजयी सलामी; चेन्नईचा पराभव