सोनं खदेरी करणाऱ्यांसाठी सुर्वण संधी, सोन्याच्या दरात झाली ‘इतक्या’ रूपयांची घट

मुंबई | आपल्या भारत देशात सोन्याला खूपच महत्व आहे. विशेष म्हणजे सोन्याच्या दागिन्यांना त्यामुळे सोन्याच्या किंमतीमध्ये दररोज चढ-उतार आपल्याला पाहायला मिळतं असतो. महिला मंडळींसाठी सोनं हे खूप जवळची गोष्ट असते.

बहुतेक लोक आपला पैसा हा सोन्यामध्ये गुंतवत असतात. तर काही सोन्याचे वेगवेगळ्या डिझाईनचे दागिने बनवतात. मात्र तर आजच्या सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी घसरण झालेली पाहायला मिळतं आहे.

बुधवार म्हणजेच 20 ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 47 हजार 490 रूपये होता. तर आच त्यामध्ये 10 रूपयाची घट झाली असून, आज 21 ऑक्टोबर रोजी सोन्याचा भाव प्रति तोळा 47 हजार 480 रूपये झाला आहे.

तसेच काल चांदीचा प्रति किलोचा भाव 64 हजार 600 रूपये होता. आज चांदीच्या किंमतीमध्ये 1300 रूपयांची वाढ झालेली असून, आज प्रती किलो चांदीचा दर 65 हजार 900 रूपये इतकाच आहे.

तसेच पुण्यामध्ये 24 कॅरेटचा भाव प्रती तोळा सोन्याचा भाव हा 48 हजार 880 रूपये इतका असून, चांदीचा भाव प्रती किलो 65 हजार 900 इतका आहे.

महत्वाच्या बातम्या-

आम्हाला तिघांना ग्रहण लागलं होतं, अजित पवारांनी विश्वास ठेवला, नाहीतर…- धनंजय मुंडे

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; महानगरपालिकेने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

“माजी पोलीस आयुक्त आणि माजी गृहमंत्री यांना मस्ती आली आहे, त्यांचे कुठं हनिमून सुरू आहे?”

“मुख्यमंत्रिपद हडपण्यासाठी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाला तिलांजली दिली”

“गाव जेवण एक दिवस देणार की पुढची तीन वर्ष देणार”