नवी दिल्ली | कोरोना महामारीनं गेल्या दीड वर्षाहून अधिक काळापासून सर्वांच्या जिवनावर अमुलाग्र बदल केला आहे. परिणामी सर्वजण अद्यापही चिंतेत आहेत. अशात आता नवीन माहिती समोर येत आहे.
कोरोना काळात अनेक मोठ्या समस्यांचा सामना सर्वांना करावा लागला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यासारखं वाटत होतं.
कोरोना कमी झाला असं वाटत असतानाच आता ओमिक्राॅनच्या प्रादुर्भावानं नवीन आव्हान उभं केलं आहे. परिणामी जगभरातील संशोधक आणि डाॅक्टर सध्या ओमिक्राॅनवर संशोधन करत आहेत.
ओमिक्राॅन विषाणूच्या जिवनमानावर अधिक संशोधन करण्यात आलं आहे. या संशोधनातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोना विषाणूबाबतही असंच संशोधन करण्यात आलं होतं.
कोरोना व्हायरसच्या आधिच्या विषाणूच्या तुलनेत ओमिक्राॅन हा प्लास्टिक आणि त्वचेवर जास्त काळ राहत आहे. त्वचेवर 21 तास तर प्लास्टिकवर 21 दिवस हा विषाणू राहत आहे.
जपानमधील क्योटो प्रीफेक्चरल युनिव्हर्सिटी ऑफ मेडिसिनच्या संशोधकांना SARS-Cov-2 वुहान स्ट्रेन आणि वातावरणातील इतर सर्व प्रकार VOCS यांच्यातील संबंध सापडला आहे.
कोरोनाच्या इतर सर्व प्रकारच्या व्हेरियंटपेक्षा सध्या ओमिक्राॅन विषाणूच्या आयुर्मानात स्पष्ट फरक आहे. वुहानच्या कोरोना स्ट्रेनपेक्षा ओमिक्राॅन हा दुप्पट काळ जिवंत राहत आहे.
प्लास्टिकवर विषाणूच आयुर्मान जास्त आहे. मुळ रूपातील कोरोना 56 तास, अल्फा 191 तास, बिटा 154 तास, गामा 59 तास, डेल्टा 114 तास या सर्वांच्या तुलनेत ओमिक्राॅन तब्बल 193 तास जिवंत रहात आहेत.
प्लास्टिकप्रमाणं त्वचेवर विषाणू जिवंत राहण्याचं प्रमाण देखील सातत्यानं वाढलेलं दिसलं आहे. ओमिक्रानचा विषाणू त्वचेवर तब्बल 21 तास जिवंत रहातो.
महत्त्वाच्या बातम्या –
अखेर समंथा नागा चैतन्यच्या घटस्फोटावर नागार्जुनने सोडलं मौन, म्हणाला “समंथाला…”
महाराष्ट्राच्या चित्ररथावरून वाद, सोशल मीडियावर नाराजीचा सूर
पदोन्नती आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
12 आमदारांचं निलंबन रद्द! देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
BREAKING: ठाकरे सरकारला मोठा धक्का, 12 आमदारांचं निलंबन अखेर रद्द