नवी दिल्ली : चाकूसह संसदेत प्रवेश करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका अज्ञात व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही व्यक्ती संसदेच्या गेट क्रमांक 1 मधून आत जाण्याच्या प्रयत्नात होती. या व्यक्तीला संसद पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.
संसदेत चाकूसह प्रवेश करणाऱ्या या तरुणाचे नाव सागर इसा असल्याचे समजते. सागर इसा हा दिल्लीतील लक्ष्मी नगर येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. तो कशासाठी आला होता, चाकू घेऊन संसदेत प्रवेश करण्याचा त्याचा उद्देश काय, याबाबतही काही समजू शकलेले नाही.
सध्या संसदेचे अधिवेशन सुरू नसल्याने संसदेसमोरील मार्ग वाहतुकीसाठी खुला आहे. मात्र, असे असले तरी संसदेत कुणालाही प्रवेश देण्यात येत नाही. अशात अचानक एक तरुण संसदेत घुसण्याचा प्रयत्न करत असल्याचे तैनात असलेल्या सीआरपीएफ जवानांच्या लक्षात आले. या तरुणाच्या हातात चाकू असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तातडीने त्या तरुणाला अडवत ताब्यात घेण्यात आले.
दरम्यान, ताब्यात घेण्यात आलेल्या या तरुणाची संसंद पोलीस ठाण्यात चौकशी करण्यात येत आहे.
Delhi: A person has been detained while he was trying to enter the Parliament allegedly with a knife. He has been taken to Parliament police station. pic.twitter.com/rKforH5i5R
— ANI (@ANI) September 2, 2019
महत्वाच्या बातम्या-
उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादी पाठोपाठ काँग्रेसला धक्का; ‘हा’ नेता शिवसेनेच्या वाटेवर – https://t.co/WbsrTDbOIY @INCMaharashtra @ShivSena
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 2, 2019
अशोक चव्हाणांना ‘हे’ पद देण्याची सोनिया गांधींची इच्छा, पण चव्हाण म्हणतात… – https://t.co/PJwhYvV1UX @AshokChavanINC @Sonia_Gandhi
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 2, 2019
सत्ता बदलली की लोक पक्ष पण बदलतात पण…- नितीन गडकरी – https://t.co/NHG72goHQb @nitin_gadkari @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 2, 2019