वाद व्हायला नको म्हणून भाजपऐवजी शिवसेनेत गेलो- अब्दुल सत्तार

मुंबई : मी भाजपमध्ये जाणार होतो पण भाजपच्या स्थानिकांनी विरोध केला. सुरवातीलाच जर वाद झाले तर काय होतं हे मला माहिती आहे म्हणून मी भाजपऐवजी शिवसेनेत गेलो, असं सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी सांगितलं आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. 

औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी सोमवारी ‘मातोश्री’वर शिवसेनेत प्रवेश केला आहे. भाजपमध्ये जाता जाता त्यांनी हाती शिवबंधन बांधल्याने सर्वजण आचंबित झालेले पाहायला मिळाले आहेत.

सिल्लोड मतदारसंघाची जागा ही भाजपच्या वाट्याला असली तरीही युती झाल्यावर ही जागा शिवसेनेच्या वाट्याला येणार आहे, हे उद्धव ठाकरेंचं वचन आहे. त्यामुळे विधानसभेला मोठ्या फरकाने विजयी होणार आहे, असा विश्वास व्यक्त करत सत्तार यांनी शिवसेनेची साथ धरली आहे. 

दरम्यान, सत्तारांनी शिवसेनेत प्रवेश करताच उद्धव यांनी सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून सत्तारांची उमेदवारी जाहीर केली.

महत्वाच्या बातम्या-