उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रशांत चेडे शिवसेनेच्या वाटेवर आहेत. त्यांनी रविवारी आपल्या जिल्ह्याध्यक्षपदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे दिल्याची माहिती समोर आली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंगळवारी ते ‘मातोश्रीवर’ शिवसेनेत प्रवेश घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.
काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून परंडा विधानसभा मतदारसंघात पदाधिकाऱ्यांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांची फरफट होत आहे, असा आरोप त्यांनी काँग्रेसवर केला आहे.
प्रशांत चेडे यांच्यासोबत वाशी, भूम, परंडा या तिन्ही तालुक्यातील तालुकाध्यक्ष आणि वाशी नगरपालिकेचे नगराध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह काही नगरसेवकही शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे.
उस्मनाबाद जिल्हापरिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य, पदाधिकारीही शिवसेनेत प्रेवश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातमधून काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
अशोक चव्हाणांना ‘हे’ पद देण्याची सोनिया गांधींची इच्छा, पण चव्हाण म्हणतात… – https://t.co/PJwhYvV1UX @AshokChavanINC @Sonia_Gandhi
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 2, 2019
सत्ता बदलली की लोक पक्ष पण बदलतात पण…- नितीन गडकरी – https://t.co/NHG72goHQb @nitin_gadkari @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 2, 2019
“सगळी पद भोगली आता मुख्यमंत्रिपदाचा विचार करेल” – https://t.co/Ry1Z0vWeGb @raosahebdanve @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 2, 2019