मुंबई | शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे असतील तर तुम्ही पेनी स्टॉक (Penny Stock) मध्ये गुंतवणूक करू शकता. हे स्टॉक खूप स्वस्त असतात आणि त्यांचे बाजार मूल्य कमी असतं.
या शेअर्सची किंमत साधारणपणे ₹25 च्या खाली असते, ज्यामुळे ते गुंतवणूकदारांसाठी खूप आकर्षक ठरतात. मात्र या शेअर्समध्ये जोखीम तितकीच जास्त आहे. मात्र अनेक पेनी स्टॉक्सनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे.
गोपाला पॉलीप्लास्ट (Gopala Polyplast) हा असाच एक स्टॉक (Stock) आहे. 9 रुपयांचा स्टॉक 650 रुपयांवर पोहोचला गोपाला पॉलीप्लास्टचा शेअर आर्थिक वर्ष 2022 मध्ये 9.10 रुपयांवरून 2022 मध्ये 650 रुपयांपर्यंत वाढला आहे. एप्रिल ते नोव्हेंबर 2021 या कालावधीत या स्टॉकमध्ये 7000 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
हा पेनी स्टॉक 8.26 रुपयांवरून 650 रुपयांपर्यंत वाढला आहे, म्हणजेच 2021 मध्ये या स्टॉकने सुमारे 7750 टक्के परतावा दिला आहे. गोपाला पॉलीप्लास्टच्या शेअरच्या प्राईज हिस्ट्रीवर एक नजर टाकल्यास, हा मल्टीबॅगर (Multibagger) पेनी स्टॉक अलीकडील ट्रेडिंग (Trading) सत्रांमध्ये प्रॉफिट बुकिंगच्या दबावाखाली आहे.
गेल्या 1 महिन्यात हा शेअर (Share) 12 टक्क्यांनी घसरला आहे, तर गेल्या 6 महिन्यात हा स्टॉक 27.55 रुपयांवरून 650 रुपयांपर्यंत वाढला आहे. या कालावधीत या शेअरमध्ये 2260 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे.
1 महिन्यापूर्वी जर एखाद्याने या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचे 1 लाख रुपये 88,000 रुपयांपर्यंत खाली आले असते. दुसरीकडे, 6 महिन्यांपूर्वी जर कोणी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे 1 लाख रुपये 23.6 लाख झाले असते.
दरम्यान, पेनी स्टॉक्समध्ये गुंतवणूक अधिक जोखमीची मानली जाते. मात्र असे काही पेनी स्टॉक्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना कमी वेळेत अनेक पटींने पैसे कमावून दिले आहेत.
पेनी स्टॉक खूप स्वस्त असतात त्यामुळे त्यात सहज गुंतवणूक करता येते. मात्र अनेकदा निवड चुकल्यामुळे तोटा होण्याचा धोका असतो.
महत्त्वाच्या बातम्या-
जिओ आणि आयडियामध्ये मोठा राडा, जिओनं केली ही धक्कादायक तक्रार
मोदींची स्तुती करणं विद्यार्थ्यांला पडलं महागात; विद्यापीठाने केलं असं काही की…
पोस्टाची बंपर योजना; लेकीच्या 18 व्या वर्षी मिळतील ‘इतके’ लाख
झेब्र्याला राग आला अन् थेट जंगलाच्या राज्यासोबतच भिडला, घडवली चांगली अद्दल, पाहा व्हिडीओ
“काँग्रेस हाच देशासाठी आणि लोकशाहीसाठी सक्षम पर्याय आहे”