ICICI बँकेच्या ग्राहकांना झटका देणारी बातमी समोर!

मुंबई | ICICI बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. CICI PayLater वापरणाऱ्या ग्राहकांना आता सेवा शुल्क (Service Charge) भरावा लागेल. सेवा शुल्क एप्रिल 2022 च्या स्टेटमेंटपासून लागू होईल.

ही सेवा वापरण्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागत नव्हते. आता मात्र यासाठी शुल्क भरावा लागणार आहे. ICICI PayLater वापरणाऱ्या ग्राहकांना 1000 रुपयांपेक्षा जास्त मासिक खर्चावर पैसे भरावे लागतील.

1001 ते 3000 रुपयांपर्यंत खर्च करण्यासाठी 100 रुपये भरावे लागतील. 3001 ते 6000 रुपयांपर्यंतच्या खर्चासाठी कराव्यतिरिक्त 200 रुपये सेवा शुल्क भरावं लागेल.

खर्च केलेल्या प्रत्येक 3000 रुपयांसाठी, 100 रुपये सेवा शुल्क जोडले जाईल. 1000 रुपयांपर्यंत खर्च करण्यासाठी कोणतेही सेवा शुल्क द्यावे लागणार नाही ही दिलासादायक बाब आहे.

ICICI Pay Later Account हे एक प्रकारचे डिजिटल क्रेडिट आहे. या सेवेअंतर्गत तुम्ही आधी खर्च करू शकता आणि नंतर पैसे देऊ शकता. या अंतर्गत, बँक आपल्या ग्राहकांना 30-45 दिवसांच्या कालावधीसाठी व्याजमुक्त क्रेडिट सेवा देत आहे.

ही सेवा ICICI बँकेच्या ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. तुम्ही ही सेवा ICICI च्या iMobile अॅप, पॉकेट्स अॅप किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे अॅक्टिव्ह करू शकता.

दरम्यान, आयसीआयसीआय पेलेटरचे यूजर्स त्यांच्या आजूबाजूच्या किराणा दुकानातून देखील याद्वारे खरेदी करू शकतात. याद्वारे तुम्ही व्यापारी UPI QR कोड स्कॅन करून पेमेंट करू शकता.

महत्त्वाच्या बातम्या- 

“दुसऱ्यांवर बोटं दाखवून हातोडे घेऊन फिरत होता, आता हा…” 

“अनिल देशमुख, आणि नवाब मलिक यांच्या कोठडीशेजारी सोमय्या राहणार” 

“नारायण राणेंच्या उंचीएवढा दुसरा नेता कोकणात नाही” 

राज्यातील शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर; ‘या’ तारखेपासून सुट्ट्या सुरू

अत्यंत धक्कादायक! सुंदर बायकोवर कोणाची नजर पडू नये म्हणून नवऱ्याने केलं भयानक कृत्य