“दुसऱ्यांवर बोटं दाखवून हातोडे घेऊन फिरत होता, आता हा…”

मुंबई | संजय राऊत यांनी आयएनएस विक्रांत निधी प्रकरणी किरीट सोमय्या यांच्यावर आर्थिक अपहार केल्याचा आरोप केला आहे. राऊतांच्या आरोपानंतर सोमय्या यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

मुंबई सत्र न्यायालयात याप्रकरणी सुनावली झाली. या सुनावणीवेळी किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. त्यामुळे सोमय्या यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.

आयएनएस विक्रांत आर्थिक अपहार प्रकरणात किरीट सोमय्या यांना कोर्टाने दिलासा देण्यास नकार दिला आहे. तसेच आयएनएस विक्रांत आर्थिक अपहार प्रकरणात सोमय्या यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. तेव्हापासून सोमय्या नॉट रिचेबल आहेत. आता यावर प्रतिक्रिया देत किशोरी पेडणेकर यांनी सोमय्यांवर टीकास्त्र सोडलं आहे .

हा कमळाचा चिखल गेला कोठे?. प्रत्येकवेळी दुसऱ्यांवर बोटं दाखवून दाखवून हातोडे घेऊन फिरत होता. आता का ‘नॉट रिचेबल’ झाला. आम्ही नेहमीच सांगतो की कागद आणि कायद्याची लढाई आहे, असं पेडणेकर म्हणाल्यात.

आपल्याकडे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे. त्या संविधानाप्रमाणे आपण लढू. मात्र, महाराष्ट्रात किरीट सोमय्या हे असं कॅरेक्टर तयार झालंय जे फक्त भोंगा घेऊन बोंबलतं, अशी बोचरी टीका सोमय्यांनी केली आहे.

अनेकांनी मला प्रश्न केला की भोंगा कोणाला झोपवू देत नाही. खरं म्हणजे ज्या भोंग्यांनी लोकांना झोपू दिलं नाही ते भाजपत गेले आणि आता शांत झोपले आहेत, असंही ते म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

“अनिल देशमुख, आणि नवाब मलिक यांच्या कोठडीशेजारी सोमय्या राहणार” 

“नारायण राणेंच्या उंचीएवढा दुसरा नेता कोकणात नाही” 

राज्यातील शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर; ‘या’ तारखेपासून सुट्ट्या सुरू

अत्यंत धक्कादायक! सुंदर बायकोवर कोणाची नजर पडू नये म्हणून नवऱ्याने केलं भयानक कृत्य

“केंद्र सरकारला लाज वाटत असेल तर…”, संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल