नोकरीची सुवर्णसंधी! ‘ही’ प्रसिद्ध IT कंपनी देणार तब्बल 60 हजार जणांना नोकरी

मुंबई | देशात मोठ्या प्रमाणावर सध्या बेरोजगारी वाढत असल्याचं अनेक सर्वेक्षणातून समोर आलं आहे. परिणामी तांत्रिक शिक्षणावर सध्या भर देण्यात येत आहे.

आटीआय, इंजिनिअरिंग, मेडिकल या क्षेत्रात आजही नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध असल्याचं अनेकदा वाचण्यात आलं असेल. मात्र, काहींना जाॅबसाठी लागणारी पात्रता कमी असल्याने जाॅब मिळणं अवघड जातं.

सध्या सर्वात जास्त जर कोणत्या क्षेत्राचा बोलबाला चालू असेल तर तो फक्त IT क्षेत्राचा आहे. कारण आयटीमध्ये मोठ्या प्रमाणावर नोकरीच्या संधी निर्माण होत आहेत. जगभरात नामांकित आणि भारतातही अनेक ठिकाणीव ऑफिसेस असणारी Capgemini IT कंपनी (Jobs in IT company) लवकरच या वर्षात तब्बल 60,000 नोकऱ्या देणार आहे.

Capgemini 60,000 नवीन कर्मचारी नियुक्त करण्याची योजना आखत आहे, अशी माहिती कॅपजेमिनी इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विन यार्दी यांनी सांगितलं आहे.

आमचे जागतिक स्तरावर सुमारे 3,55,000 कर्मचारी आहोत आणि त्यापैकी निम्मे भारतात आहेत आणि आम्हाला हेडकाउंटमध्ये चांगली वाढ दिसून येत आहे. त्यामुळे आम्ही या आर्थिक वर्षात इतकी मोठी पदभरती करण्याचा निर्णय घेतला आहे असं कॅपजेमिनी इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विन यार्दी यांनी सांगितलं आहे.

5G आणि क्वांटम सारख्या उदयोन्मुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून नवीन नियुक्ती ही नवीन नियुक्ती आणि लॅटरल टॅलेंट यांचे मिश्रण असेल. Capgemini ने Ericsson सोबतच्या भागीदारीसह गेल्या वर्षी भारतात 5G लॅब लाँच केली आहे.

कॅपजेमिनीकडे क्लाउड आणि एआयसाठी एक अकॅडमी आहे जिथे आम्ही विशिष्ट क्षमता आणि सायबरसुरक्षा तयार करत आहे. आम्ही या सर्वांमध्ये ट्रेंड पाहतो. म्हणूनच ही भरती या क्षेत्रांमध्ये केली जाणार आहे, असंही ते म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या-

ICICI बँकेच्या ग्राहकांना झटका देणारी बातमी समोर

“दुसऱ्यांवर बोटं दाखवून हातोडे घेऊन फिरत होता, आता हा…” 

“अनिल देशमुख, आणि नवाब मलिक यांच्या कोठडीशेजारी सोमय्या राहणार” 

“नारायण राणेंच्या उंचीएवढा दुसरा नेता कोकणात नाही” 

राज्यातील शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर; ‘या’ तारखेपासून सुट्ट्या सुरू