वैज्ञानिकांना लागला दुसऱ्या पृथ्वीचा शोध?

नवी दिल्ली | अंतराळ संशोधकांच्या एका टिमला एका नव्या ग्रहाचा (Planet) शोध लागला आहे. संशोधकांच्या एका टिमला पृथ्वीपासून (Earth) 100 प्रकाशवर्षे दूरवर असलेला एक नवा ग्रह शोधला आहे.

या नवीन ग्रहाचे नाव TOI-1452b असे ठेवण्यात आले आहे. हा ग्रह आपल्या सूर्यमंडळाच्या (Solar System) कक्षेच्या बाहेर आहे. हा ग्रह दोन ताऱ्यांची परिक्रमा करतो. (फेरी मारतो)

आश्चर्याची बाब म्हणजे या ग्रहावर समुद्र (Sea) देखील आहे. या ठिकाणी मोठा समुद्र असल्याचा शोध देखील वैज्ञानिकांनी लावला आहे. याचमुळे या ग्रहाला ओशिअन प्लॅनेट (Asian Planet), समुद्र असलेला ग्रह म्हणून संबोधण्यात आले आहे.

हा ग्रह आकाराने आपल्या पृथ्वीपेक्षा 70% मोठा आहे. कॅनडाच्या (Canada) एका अंतराळ संस्थेने हा शोध घेतला आहे. कॅनडाच्या मॉन्ट्रियल युनिव्हर्सिटीच्या (Montreal University) नेतृत्वात हा शोध घेण्यात आला.

हा ग्रह पृथ्वीपेक्षा पाच पट मोठा आहे. या ग्रहावर दगड (Stone) आढळून आले आहेत. त्यामुळे या ग्रहाला सुपर अर्थ (Super Earth) असेही संबोधन्यात आले. या ग्रहावर असणारा समुद्र हा एकूण ग्रहाच्या 30% आहे.

पृथ्वीची तुलना केली तर पृथ्वीवर 70% समुद्र आहे. मात्र द्रव्यमानाचा विचार केल्यास हा समुद्र पृथ्वीच्या केवळ 1% इतकाच आहे. संशोधकांच्या शोधानुसार हा ग्रह त्याच्या ताऱ्यापासून फार दूर आहे.

त्याच्या दूर असल्यामुळे त्याचे तापमान जास्त गरम किंवा थंड नसते. त्यामुळे या ग्रहावर द्रव्य स्वरुपात पाणी मिळण्याची शक्यता आहे. असाच पाण्याचा थर शनी आणि बृहस्पती या ग्रहांवर असण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या –

देवेंद्र फडणवीसांच्या “विनाशकाले विपरीत बुद्धिला” आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर, म्हणाले…

‘संभाजीराजेंचं नेतृत्व नको’; मराठा क्रांती मोर्चा आक्रमक

पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, “विधानपरिषद निवडणुकांत…”

मोठी बातमी! पाकिस्तानने जाहीर केली राष्ट्रीय आणीबाणी; तीस लाख लोक बेघर

नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते; अमेरिकेचे सर्वेक्षण